Saturday, October 26, 2019

नाविन्यपूर्ण उपक्रम समाजात सकारात्मक बदल घडवत असतात - उपविभागीय अधिकारी रामेश्वर रोडगे

उस्मानाबाद -
सातत्याने समाजात नावीन्यपूर्ण उपक्रम राबवून समाजात सकारात्मक बदल घडत असतो असे प्रतिपादन उपविभागीय अधिकारी रामेश्वर रोडगे यांनी केले.एकता फाउंडेशन उस्मानाबाद आणि संतकृपा बहुउद्देशीय सामाजिक संस्था संचलित सद्गुरू जोग महाराज गोशाळा यांच्या संयुक्त विद्यमानाने वाघोली येथे आयोजित गोमाता पूजन व कीर्तन महोत्सवात ते बोलत होते.
          यावेळी जिल्हा सरकारी वकील अँड. शरद जाधवर, सहाय्यक पोलिस निरीक्षक शरदकुमार रोडगे, ह.भ.प.अनिल पाटील, ह.भ.प. नवनाथ चिखलीकर, एकता फाउंडेशन अध्यक्ष अमित कदम, ह.भ.प.आकाश मगर यांची प्रमुख उपस्थिती होती.
          शेतकऱ्यांनी शेती सोबतच दुग्ध व्यवसाय करत आपल्या कडील जास्तीत जास्त देशी गायीचे संवर्धन करावे व त्याच बरोबर अशा कार्यक्रमांमुळे आपल्या संस्कृतीचे जतन होण्यास मदत होईल. एकता फाऊंडेशन व जोग महाराज गोशाळा यांनी अशा कार्यक्रमाचे आयोजन केल्याबदल कौतुक केले.
          रामेश्वर रोडगे पुढे बोलताना म्हणाले की युवकांनी पुढे येऊन गावाच्या विकासासाठी प्रयत्न करावेत यासाठी प्रशासनाच्या वतीने जी काही मदत लागेल ती मदत करण्याचे आश्वासन यावेळी देण्यात आले. प्रशासन, वारकरी, युवकवर्ग यांच्या जो ञिवेणी संगम याठिकाणी घडवुन आणला ही बाब अतिशय कौतुकास्पद असल्याचे हि मत त्यांनी यावेळी व्यक्त केले.
          अँड शरद जाधवर यांनी बोलताना वसुबारस चे महत्व सांगत प्रत्येकाने आपल्या घरी देशी गायीचे संवर्धन करावे असे आवाहन यावेळी केले.देशी गायीचे दुध आपल्या आरोग्यास चांगले असुन संकरित दुधापासून होणाऱ्या आजारा पासून यामुळे आपणांस सुटका मिळेल.एकता फाऊंडेशन करत असलेले कार्य अतिशय उत्तम आहे असे ही यावेळी बोलताना म्हणाले.
          ह.भ.प अनिल पाटील महाराज यांनी धन्य आजि दिन झाले संताचे दर्शन जाली पापातापा तुटी दैन्य गेलें उठाउठीं या अभंगावर आपली किर्तन सेवा सादर केली.
          कार्यक्रमाचे प्रास्ताविक भाषणात एकता फाऊंडेशनचे सचिव आभिलाष लोमटे यांनी  कार्यक्रम आयोजनामागची भूमिका विशद करत आपली संस्कृती जपण्यासाठी प्रत्येकाने असे कार्यक्रम आयोजीत करावे असे आवाहन यावेळी केले.
          कार्यक्रमाची सुरुवात गोमाता पूजन करून करण्यात आली. यावेळी रामेश्वर रोडगे यांचा एकता परिवाराच्या वतीने शाल व सन्मानपञ देऊन सत्कार करण्यात आला. त्याचबरोबर विविध क्षेत्रात निवड झालेल्या वाघोली गावातील गुणवंताचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.
          यावेळी कार्याध्यक्ष विशाल थोरात, प्रसाद देशमुख,सरपंच बाळासाहेब गोगावे, श्रीकृष्ण धर्माधिकारी,अमर पवार, सचिन बारस्कर, आनंद खडके,अँड.विक्रम सांळुके,प्रशांत पाटील, दिपक साखरे,पंकज सुलाखे, एकता फाउंडेशन सदस्य, वैष्णव विचारधारा संघ, व्यसनमुक्त युवक संघ व ग्रामस्थ उपस्थित होते.

ग्लोबल एज्युकेशनल इन्स्टिट्युट पिंपरखेड येथे संविधान दिन साजरा व शहीदांना आदरांजली

    परंडा - (प्रतिनिधी)परंडा तालुक्यातील पिंपरखेड येथील ग्लोबल एज्युकेशनल इन्स्टिट्युट मध्ये संविधान दिन साजरा करण्यात आला.भारतीय संविधान आण...