उस्मानाबाद जिल्ह्यात कोरोनाचा पहिला बळी, उमरगा येथील ६० वर्षीय वृद्धाचा मृत्यूउस्मानाबाद - उस्मानाबाद जिल्ह्यात कोरोनाचा पहिला बळी गेला आहे. बेडगा तालुका उमरगा येथील ६० वर्षीय वृद्धाचा उमरगा येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. तीन दिवसांपूर्वी त्यांचा कोरोना अहवाल पाॅझिटीव्ह आला होता. आज संध्याकाळी त्यांची प्रकृती बिघडली होती. उस्मानाबाद येथे पुढील उपचारासाठी आणण्यात येणार होते मात्र तत्पूर्वी त्यांचा मृत्यू झाला आहे.जिल्ह्यात एकूण ६२ रुग्ण आढळून आले होते त्यातील ५० जणांवर उपचार सुरू आहेत तर उर्वरित रुग्णांना डिस्चार्ज मिळाला आहे.

No comments:

Post a Comment