अखेर तीर्थक्षेत्र पंढरपूर, गोपाळपूर सह तालुक्यात मुंबईहुन कोरोना पोहोचला

  • सुरक्षेच्या दृष्टीने शहरातील काही भाग सिल
  • पंढरपूर शहर-2,तालुक्यात-3 रूग्ण पाॅझीटीव्ह


पंढरपूर(प्रतिनिधी):- अवघ्या महाराष्ट्राचे आराध्य दैवत असणार्‍या तीर्थक्षेत्र पंढरपूर व गोपाळपूर येथे तसेच तालुक्यातील उपरी ,करकंब  याठिकाणी कोरोना पॉझिटिव्ह चे एकूण पाच रुग्ण सापडल्याने एकच खळबळ उडाली आहे.  नाही म्हणता म्हणता अखेर पंढरपूर शहर  तसेच पंढरपूर पासून तीन किलोमीटर वर असलेला गोपाळपूर तसेच उपरी आणि करकंब येथे कोरोनाचे रूग्ण सापडताच शहर व परिसरात मात्र भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्याचबरोबर प्रशासकीय यंत्रणेवर याचा ताण वाढला आहे. पंढरपूर तालुक्यातील उपरी येथे मागील आठवड्यात मुंबईहून आलेली व्यक्तीला गावातील शाळेत क्वाॅरंटाईन केले होते तो  रुग्ण पॉझिटिव्ह निघाल्यानंतर तीर्थक्षेत्रात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते या व्यक्तीच्या संपर्कात आलेले व क्वाॅरंटाईन असलेले एकूण ५१ जणांचे स्वॅब तपासणीसाठी प्रशासनाने पाठवले होते त्या व्यक्तीचा अहवाल रिपोर्ट आज प्राप्त झाला असून एकूण ५१ व्यक्तींपैकी ४५ जणांचा रिपोर्ट निगेटिव्ह आला आहे तर उपरीतील एक महिला, गोपाळपूर येथील एक महिला, पंढरपूर येथील दोन आणि करकंब येथील एक असे पाच रुग्ण पॉझिटिव्ह आले असून एका  अहवालाचा रिपोर्ट येणे बाकी आहे.
पंढरपूर शहरातील दोन रुग्ण आढळून आल्याने पंढरपूरकरांची चिंता वाढली असून सतर्क राहण्याची गरज आहे. आज एकूण पाच कोरोना  पॉझिटिव्ह रुग्ण सापडले त्यापैकी पंढरपूर, गोपाळपूर,उपरी येथील व्यक्ती मुंबई येथून आलेले होते तर करकंब येथे पुणे येथून आलेला व्यक्ती कोरोना झाल्याचे माहिती आज प्रांताधिकारी सचिन ढोले यांनी दिली
कोरोना रुग्ण सापडलेल्या परिसरातील नागरिकांची चिंता वाढली असून प्रशासनाच्या नियमानुसार नागरिकांनी प्रत्येक अर्ध्या तासाला हात धुणे तोंडाला मास्क लावणे वेळोवेळी टायगर चा वापर करणे या नियमांचे पालन आता तंतोतंत करण्याची गरज निर्माण झाली आहे. मुंबई येथून आलेले व्यक्तींना वाखरी येथील एम आय टी मध्ये होम क्वाॅरंटाईन  करण्यात आले होते तर पंढरपूरच्या एका व्यक्तीला कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालयात क्वाॅरंटाईन केले असल्याची माहितीही यावेळी प्रांताधिकारी सचिन ढोले यांनी दिली.


पंढरपूरशहरातील हा भाग सुरक्षिततेच्या दृष्टीने केला सिल-- पंढरपूर शहरातील सावरकर चौक ते इंदिरा गांधी चौक ते अर्बन बँक ते शिवाजी चौक ते सावरकर चौक असा हा संपूर्ण चौरस एरिया सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून सील करण्यात आला असून या परिसरातील नागरिकांनी विनाकारण किंवा कोणत्याही बहाण्याने बाहेर पडू नये घरातच राहून प्रशासनास सहकार्य करावे खबरदारीच्या उपाययोजना अमलात आणून प्रशासनाच्या नियमांचे पालन करावेअसे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात येत आहे.

No comments:

Post a Comment