उस्मानाबाद जिल्ह्यात ६ नवे कोरोना बाधितउस्मानाबाद
- उस्मानाबाद जिल्ह्यातील कोरोना बाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. उस्मानाबाद जिल्ह्यातील कोरोना बाधितांचि संख्या ६ ने वाढली आहे. आज उमरगा येथे ३ परंडा येथे १ तर जिल्हा शासकीय रुग्णालय उस्मानाबाद येथे २ रुग्णांचे अहवाल होकारात्मक आले  असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. राजाभाऊ गलांडे यांनी दिली. आज जिल्ह्यात एकूण ४७ रुग्णांचे अहवाल आले आहेत. त्यातील ३५ जणांचे नकारात्मक तर ६ जणांचे अनिर्णित तर ६ जणांचे होकारात्मक आले आहेत.
सहापैकी उस्मानाबाद शहरातील एक रुग्ण देशपांडे स्टॅन्ड, जोशी गल्ली येथील असून, सोलापूर रिटर्न आहे. दुसरा धुता येथील 30वर्षीय महिला असून मुंबई रिटर्न आहे. तर उमरगा तालुक्यातील तीन पैकी दोन उमरगा शहरातील आहेत तर एक केसर जवळगा येथील आहे. परंडा येथील एक रुग्ण कुक्कड गाव येथील आहे.

No comments:

Post a Comment

उस्मानाबाद जिल्हयात सर्वादिक दर आयाण-बाणगंगा साखर कारखाना ऊस उत्पादक शेतकऱ्यांना देणार-अजित पवार

परंडा (भजनदास गुडे) आयाण - बाणगंगा सहकारी साखर कारखाना ऊस उत्पादक शेतकऱ्यांना जिल्ह्यतील इतर कारखाण्या पेक्षा जादा दर देणार असल्याचे राष्ट्र...