पंढरीत सोलापूरहुन येणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांना ३० जून पर्यंत शहरात रहाणे बंधनकारक


  • बाहेर गावांवरून ये जा करणार्यावर होणार कारवाई

पंढरपूर (प्रतिनिधी):- पंढरपूर शहरात सोलापूर हुन येणाऱ्या सर्व शासकीय, निमशासकिय ,बॅंक  कर्मचाऱ्यांना ३० जून पर्यंत कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पंढरपूर  शहरात रहाणे बंधनकारक करण्यात आले आहे.
पंढरपूर शहरा मध्ये कोरोना विषाणूचा  प्रादुर्भाव व संसर्ग रोखण्यासाठी व नियंत्रणासाठी आज पंढरपूर शहरातील सर्व बँक शाखा प्रमुख व इतर कार्यालया चे प्रमुखांची  बैठक मुख्याधिकारी  अनिकेत मानोरकर  उपमुख्याधिकारी सुनिल वाळूजकर, बँक को  ऑर्डीनेटर योगेश काळे यांचे उपस्थितीत नगरपरिषदेत संपन्न झाली.
या वेळी शहरामध्ये असलेल्या सर्व बँकेमध्ये व इतर शासकीय कार्यालयात व इतर कार्यालयात  बाहेरगावाहून विशेषतः सोलापूर हुन काही कर्मचारी कामासाठी येत आहेत अशा तक्रारी प्राप्त झाल्या होत्या तसेच सध्या सोलापूर मध्ये कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता शहरातील नागरिक अथवा बँकेत काम करणारे कर्मचार्‍यांना   कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव व संसर्ग होऊ नये यासाठी काळजी घेणे आवश्यक आहे. याबाबत इंसिडेंट कमांडर तथा उपविभागीय अधिकारी सचिन ढोले यांनी शहरातील बँकांना नोटीस बजावण्या बाबत सूचना दिल्या होत्या त्यानुसार नगरपरिषदेने शहरातील सर्व बँकांना व इतर कार्यालयांना नोटीसा  बजावल्या होत्या व आज सर्व बँकेचे शाखा प्रमुख व इतर शासकीय कार्यालयातील प्रमुखांची बैठक नगरपरिषद सभागृहात संपन्न झाली या बैठकीमध्ये मुख्याधिकारी अनिकेत मानोरकर यांनी बँकेत येणाऱ्या प्रत्येक ग्राहकाची नोंद रजिस्टर ला घ्यावी व  त्यांचे थर्मल स्क्रीमींग करण्यात यावे एखाद्या ग्राहकांला ताप असेल तर त्वरित नगर परिषदेशी संपर्क साधावा तसेच सर्व बँकेचे शाखाप्रमुख इतर कार्यालय यांनी आपल्या बँकेत व कार्यालयात  सोलापूर हुन अथवा इतर गांवावरून किती कर्मचारी दररोज ये जा करतात  याची माहिती नगरपरिषदेला त्वरित द्यावी, कार्यालयातील अथवा बँकेतील सर्व कर्मचाऱ्यांचे पल्स ऑक्झिमीटर द्वारे तपासणी करण्यात यावी, सर्व एटीएम चे वेळोवेळी सॅनिटायझर करण्यात यावे ,येणाऱ्या प्रत्येक ग्राहकाचे हातावर सॅनिटीझर मारूनच बँकेत प्रवेश द्यावा, कर्मचारी व ग्राहक यांनी मास्क वापरलाच पाहिजे तसेच सोशल डिस्टन्स राखला जाईल याची दक्षता घ्यावी  दरम्यान बाहेर गांवावरून येणारा कर्मचारी हा मुख्यकार्यालयाच्या  ठिकाणी राहिला पाहिजे तो कोणत्याही परिस्थितीत बाहेर गांवी ये जा करणार नाही याची दक्षता घेण्याची जबाबदारी सम्बधित कार्यालय प्रमुखांची राहील जर एखादा कर्मचारी सूचना देऊनही असा बाहेर गांवी ये जा करत असल्याचे निदर्शनास आल्यास किंवा त्या बाबत तक्रार आल्यास त्यांचेवर व कार्यालय प्रमुखा वर आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५ मधील तरतुदीनुसार कायदेशीर कारवाई केली जाईल आशा प्रकारच्या सक्त  सूचना या बैठकीत देण्यात आल्या या बैठकीस शहरातील सर्व बँक शाखा प्रमुख व इतर कार्यलय प्रमुख हजर होते.

No comments:

Post a Comment