ट्रकने मोटारसायकलला जोरदार धडक दिल्याने दोघांचा मृत्यूनळदुर्ग :- ट्रकच्या  जोरदार धडकेत मोटर सायकलवरील दोघांचा मृत्यू झल्याची घटना 24 जून रोजी सायंकाळी 6:30 च्या सुमारास आलियाबाद पुलाजवळ  घडली. याबाबत अधिक माहिती अशी की औरंगाबाद येथे कामाला असलेले उल्हास सोमवंशी(वय 30) व सागर पाटील (वय 28, दोघेही रा. आष्टाकासार ता. लोहारा) हे दोघे आपली चुलत बहिणीच्या लग्नाला औरंगाबादहून नळदुर्ग मार्गे आपली मोटर सायकल MH- 20 BP- 3381 वरून आष्टा कासार येथे निघाले होते त्यांची मोटर सायकल नळदुर्ग  राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 65 वरील नळदुर्ग शिवारातील आलियाबाद पुलाजवळ आली असता हैदराबादहुन सोलापूरच्या दिशेने भरधाव निघालेल्या ट्रक क्रमांक MH-25 U- 4045 ने मोटर सायकलला जोरादार धडक दिली. त्यात उल्हास सोमवंशी यांचा जागीच मृत्यू झाला तर गंभीर जखमी असलेले सागर पाटील यांना उपचारासाठी सोलापूरला घेऊन जात असताना रस्त्यातच मयत झाले. दरम्यान धडके नंतर पोबारा केलेला ट्रक अणदूर जवळ पोलिसांच्या मदतीने पकडल्याचे समजते, नळदुर्ग पोलीस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत गुन्हा नोंदविण्याची कार्यवाही सुरु होती.

No comments:

Post a Comment