हाथरस येथील आरोपीना फाशी द्यावी,मुख्यमंत्री योगी यांनी राजीनामा द्यावा- प्रविण धेंडे यांची मागणी


राहुल कांबळे तासगाव प्रतिनिधी दि.५
       आज तासगाव येथे उत्तरप्रदेश हातरस येथील दलित मुलीची सामुहिक बलात्कार करूण हत्या केल्या प्रकरणी आरोपींना फाशी द्यावी सदरच्या प्रकरणाची नैतिक जबाबदारी स्वीकारून  भाजपचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी तात्काळ राजीनामा द्यावा तसेच हाथरस विभागाचे जिल्हाधिकारी व व जिल्हा पोलीस अधीक्षक यांना सहआरोपी करावे या आग्रही मागणीसाठी तासगाव तालुका रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गटाच्या)वतीने तासगाव येथे निषेध व्यक्त करून तासगावचे पोलीस निरीक्षक राजेंद्र सावंत्रे यांना यासंदर्भात निवेदन देण्यात आले.
या निवेदनाद्वारे आरोपीना तात्काळ  फाशी देण्यात यावी या सह उत्तर प्रदेश मुख्यमंत्री योगी आदित्य नाथ यांनी राजीनामा दिला पाहिजे व तेथील जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक यांची भूमिका संशयास्पद असल्याने त्याना हि सह आरोपी करण्यात यावे आणि तेथील १२ गावातील लोकांनी आरोपिंच समर्थन केल्याने त्यांना ही सहआरोपी करावे अशी मागणी करण्यात आली.
यावेळी बोलताना प.म.उपाध्यक्ष प्रमोद अमृतसागर यांनी उत्तरप्रदेशातील जातीयवादी भाजप सरकारचा व प्रशानाचा तीव्र शब्दात निषेध व्यक्त करूण अशा लोकांना आमच्या हवाली करा असे मत व्यक्त केले.
नेते भीमराव भंडारे यांनी ही उत्तर प्रदेश सरकारचा तीव्र शब्दात निषेध केला.
शेतकरी कामगार पक्षाचे नेते अर्जुन थोरात यांनी ही गप्प बसून चालणार नाही असे व्यक्त होत निंदनीय प्रकार असा निषेध केला समाज भूषण पुरस्कर्ते मिलिंद माने.व माजी नगरसेवक म्हाकू मोरे यांनी आपल्या भावना व्यक्त करत पुन्हा क्रांती करण्याची वेळ आली आहे अशा भावना व्यक्त केल्या.
      यावेळी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले ) तालुका उपाध्यक्ष दिनेश डावरे, युवक तालुका अध्यक्ष जयेश कांबळे,तालुका कार्य अध्यक्ष सुहास कांबळे,तालुका सरचिटनिस संतोष लोंढे,जिल्हा युवक उपाध्यक्ष निलेश गवाळे,तालुका अपंग आघाडी अध्यक्ष हर्षवर्धन थोरात, युवक कार्य अध्यक्ष वैभव कांबळे, यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.
आरपीआय आठवले गटाचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले साहेब हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारमध्ये समाज कल्याण राज्यमंत्री म्हणून सध्या कार्यरत आहेत.त्यांच्याच पक्षाचे तासगाव तालुक्यातील कार्यकर्ते व पदाधिकारी कार्यकर्ते आज उत्तरप्रदेशच्या हातरसच्या घटनेसंदर्भात आक्रमक होताना दिसत दिसत आहेत त्यामुळे सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत

No comments:

Post a Comment