Sunday, November 21, 2021

पावसाने बाजार उठवला ; शेतकऱ्यांसाठी नुकसानवार

 उस्मानाबाद - कोव्हिड मुळे बंद असलेला बाजार दिवाळीपूर्वी सुरू झाला. मात्र त्यानंतर लाल परीचा संप सुरू झाला त्याचा फटका शेतकरी व्यापाऱ्यांना सहन करावा लागत आहे मात्र आज उस्मानाबाद येथील आठवडी बाजारात पावसाने हजेरी लावली आणि अक्षरशः बाजार उठवला. पाऊस सुरू झाल्याने अनेक ग्राहक बाजाराकडे फिरकले नाहीत त्यामुळे शेतकरी आणि व्यापाऱ्यांसाठी हा नुकसानवार ठरला.
शहरात आज सकाळपासूनच ढगाळ वातावरण होते. सकाळी ११ च्या दरम्यान हलक्या सरी पडून गेल्या होत्या. आठवडी बाजारात खरी गर्दी दुपारी दोन वाजेनंतर च होते. २.३० च्या दरम्यान पुन्हा जोराचा पाऊस सुरू झाला तो ३० मिनिटे सुरू होता. शहरात सगळीकडेच पाऊस असताना आठवडी बाजार त्यातून कसा सुटणार सगळीकडे चिखल झाल्याने ग्राहकांना भाजीपाला खरेदी करण्यासाठी अडचण येत असल्याचे पाहायला मिळाले.

भाज्यांचे दर

बटाटे ३० ₹/किग्रॅ.

वांगी ४० ₹/किग्रॅ.

भेंडी, गवार ,दोडका ६० ₹/किग्रॅ.

पालक मेथी, शेपू  १० ₹ तीन पेंडी

ग्लोबल एज्युकेशनल इन्स्टिट्युट पिंपरखेड येथे संविधान दिन साजरा व शहीदांना आदरांजली

    परंडा - (प्रतिनिधी)परंडा तालुक्यातील पिंपरखेड येथील ग्लोबल एज्युकेशनल इन्स्टिट्युट मध्ये संविधान दिन साजरा करण्यात आला.भारतीय संविधान आण...