Thursday, November 18, 2021

विशाल जमाले यांच्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रम


 कसबे तडवळे - उस्मानाबाद तालुक्यातील कसबे तडवळे येथे शिवसेनेचे युवा नेते ग्रामपंचायत सदस्य विशाल जमाले यांच्या वाढदिवसानिमित्त आज दिनांक19 नोव्हेंबर रोजी सायंकाळी ठीक 6.00वाजता बाजारपेठ येथे शेतकऱ्यांसाठी वरदान ठरलेले महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध हवामान अभ्यासक व शेती तज्ञ  पंजाबराव डख यांचे शेतकऱ्यांच्या शेतातील रब्बी हंगामातील हरभरा पिकाचे उत्पादन वाढीसाठी शेतकऱ्यांना मार्गदर्शन होणार आहे.तर दिनांक 24 नोव्हेंबर रोजी संध्याकाळी ठीक 6.00 वाजता शिवाजी चौक येथे महाराष्ट्रातील प्रख्यात शिवशाहीर संतोष साळुंके टीव्ही स्टार यांच्या बहारदार पोवाड्याचा कार्यक्रम यासह विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.तरी याचा सर्व शेतकरी बंधू व शिवप्रेमींनी याचा आवश्यक लाभ घ्यावा.असे अवाहन विशाल दादा जमाले मित्र परिवाराच्या वतीने करण्यात आले.