Friday, November 19, 2021

उस्मानाबाद जिल्ह्यातील ११९ ग्रामपंचायतीमधील १७९ जागांसाठी पोटनिवडणूक होणार


उस्मानाबाद -   निधन, राजीनामा, अनर्हता किंवा इतर अन्य कारणांमुळे ग्रामपंचायतीतील रिक्त झालेल्या जागांच्या पोटनिवडणूकांसाठी पारंपारिक पध्दतीने राबविण्यात यावयाचा निवडणूक कार्यक्रम निवडणूक आयोगाने जाहीर केला असून त्याबाबत आदेश देण्यात आले आहे.

 उस्मानाबाद जिल्ह्यात ११९ ग्रामपंचायतीमधील १७९ पदे विविध कारणांमुळे रिक्त आहेत.दिनांक १८/०२/२०२१ रोजी अंतिम मतदार यादी प्रसिध्द होणाऱ्या ग्रामपंचायतींपैकी खालील बाबींची पूर्तता करणाऱ्या ग्रामपंचायतींमधील रिक्त पदांच्या पोटनिवडणुक कार्यक्रम राबविण्यासाठी आदेशित करण्यात आले आहे.

१. ज्या ग्रामपंचायतीमध्ये कोवीड अॅक्टीव्ह रुग्ण संख्या नगण्य आहे.

२. ज्या ग्रामपंचायतीची मुदत संपण्यास सहा महिन्याचा पेक्षा जास्त कालावधी शिल्लक आहे. अश्याच ग्रामपंचायतीत रिक्त असलेल्या पदावर पोटनिवडणुका होणार आहेत.

निवडणुकीचे टप्पे

नागरिकांच्या मागासवर्ग प्रवर्गाची अतिरिक्त ठरलेली रिक्त  जागा सर्वसाधारण जागा म्हणून अधिसूचित करण्यासाठी पूर्वी सार्वत्रिक निवडणूकीसाठी प्रसिध्द केलेल्या अंतिम प्रभाग रचनेच्या अधिसूचनेमध्ये सुधारणा करण्याचा दिनांक  दिनांक २२/११/२०२१ (सोमवार) पर्यंत


तहसिलदार यांनी निवडणुकीची नोटीस प्रसिध्द करण्याचा दिनांक २२/११/२०२१ (सोमवार)


नामनिर्देशनपत्रे मागविण्याचा व सादर करण्याचा दिनांक व वेळ (नमुना अ अ मध्ये नमूद केलेल्या ठिकाणी) दिनांक ३०/११/२०२१ (मंगळवार) ते दिनांक ०६/१२/२०२१ (सोमवार) वेळ सकाळी ११.०० ते दु. ३.००


नामनिर्देशनपत्र छाननी करण्याचा दिनांक व वेळ (नमुना अ अ मध्ये नमूद केलेल्या ठिकाणी )दिनांक ०७/१२/२०२१ (मंगळवार) वेळ सकाळी ११.०० वाजल्यापासून छाननी संपेपर्यंत


नामनिर्देशनपत्र मागे घेण्याचा अंतिम दिनांक व वेळ (नमुना अ अ मध्ये नमूद केलेल्या ठिकाणी) दिनांक ०९/१२/२०२१ ( गुरुवार) दुपारी ३.०० वा. पर्यंत


निवडणूक चिन्ह नेमून देण्याचा तसेच अंतिमरित्या निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांची यादी प्रसिध्द करण्याचा दिनांक व वेळ दिनांक ०९/१२/२०२१ ( गुरुवार) दुपारी ३.०० वा. नंतर


आवश्यक असल्यास मतदानाचा दिनांक दिनांक २१/१२/२०२१ (मंगळवार) सकाळी ७.३० वा. पासून ते सायं. ५.३० वा. पर्यंत 


मतमोजणीचा दिनांक (मतमोजणीचे ठिकाण व वेळ जिल्हाधिकाऱ्यांच्या मान्यतेने तहसिलदार निश्चित करतील त्यानुसार राहील) दिनांक २२/१२/२०२१ (बुधवार)


जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत निवडणुकीच्या निकालाची अधिसूचना प्रसिध्द करण्याचा अंतिम दिनांक दिनांक २७/१२/२०२१ (सोमवार) पर्यंत












माजी सभापती विनायक आबा विधाते यांचे निधन

  कारी - ( प्रतिनिधी) - तालुक्यातील कारी येथील प्रगतशील शेतकरी,बार्शी पंचायत समितीचे माजी सभापती विनायक (आबा) अनंत विधाते (वय ७५)यांचे अल्पश...