दैनिक जनमत : महागाईचा फटका, हिवाळा सुरु होऊनही अंडी विक्री कमीच

Friday, November 26, 2021

महागाईचा फटका, हिवाळा सुरु होऊनही अंडी विक्री कमीचउस्मानाबाद (कुंदन शिंदे) - संडे हो या मंडे रोज खाओ अंडे म्हणून ताव मारणाऱ्या व्यक्तींनी सध्या अंडी खरेदीकडे पाठ फिरवली आहे. हिवाळा सुरू होऊन देखील अंडी महागल्याने ग्राहकांनी पाठ फिरवल्याचे चित्र उस्मानाबाद शहरात दिसत आहे.

अंडी हे प्रोटीन मिळवण्यासाठीचा सर्वोत्कृष्ट आणि स्वस्त पर्याय मानला जातो त्यामुळे अनेकजण अंड्यांची खरेदी करत असतात. सर्वच गोष्टींना जाळ्यात घेणाऱ्या महागाई तून अंडीही सुटली नाहीत उस्मानाबाद शहरात वाशी आणि नान्नज पोल्ट्री फार्ममधून तसेच सोलापूर येथूनही अंडी येतात शहरात चार ते पाच होलसेल दुकाने आहेत या एकाऐक दुकानातून दररोज ५००० ते ६००० हजारांपर्यंत अंड्यांची विक्री होते सध्या उस्मानाबाद शहरात घाऊक बाजारात अंड्यांचे शेकडा दर ४६० रूपयांपर्यंत आहेत डझनाचे दर ६० रूपये इतके आहे किरकोळ बाजारात एका अंड्यांची किंमत पाच ते सहा रूपये इतकी आहे गेल्या दोन महिन्यांपूर्वी अंड्यांचे दर ३८० ते ४०० रूपये होते हिवाळ्यात अंड्यांना मोठी मागणी असते पण दरवाढीमुळे अंडी परवडत नसल्याने अनेक लोक अंडी घेत नाहीत पेट्रोल डिझेल दरवाढीचा फटका आम्हाला बसला आहे खर्च वाढला आहे गेल्या वर्षी कोरोना काळात अंड्यांना मागणी होती मात्र महागाई मुळे पण ग्राहक अंडी खरेदी साठी येत नाहीत असे विक्रेत्यांचे म्हणणे आहे. येत्या काळात थंडी वाढली तर ग्राहक खरेदीसाठी येतील अशी आशा विक्रेत्यांना आहे.


पेट्रोल डिझेल दरवाढीचा विक्रीवर परिणाम झाला सध्या अंड्यांची खरेदी कमी झाली.महागाई झाल्यामुळे अंडी खरेदीसाठी ग्राहकांकडून पाठ फिरवली आहे 

अमीज पठाण विक्रेता