राज्यपालांना जोडे मारून केला वक्तव्याचा निषेध, राष्ट्रवादी आक्रमक

 


उस्मानाबाद - राज्यपाल भगतसिंह कोशारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि समर्थ रामदास यांच्या वरील केलेल्या वादग्रस्त विधानाच्या विरोधात उस्मानाबाद राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने आणि बहुजन समाजाच्या वतीने निदर्शने करण्यात आली. प्रतिकात्मक पुतळ्यास जोडे मारून आंदोलन करण्यात आले.  तसेच राज्यपालांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत निदर्शने करण्यात आली तसेच राष्ट्रपतींनी या वक्तव्याची दखल घेऊन कोशारी यांना राज्यपाल पदावरून हटवावे अशी मागणी करण्यात आली. तसेच यापुढे अशी वक्तव्ये आल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला. यावेळी पृथ्वीराज चीलवंत, रणवीर इंगळे, सचिन शेंडगे, मृत्युंजय बनसोडे, महादेव माळी, बाबा मुजावर, नामदेव वाघमारे आदी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment