दैनिक जनमत : दीड हजाराची लाच घेताना कनिष्ठ अभियंता लाचलुचपत च्या जाळ्यात

Monday, March 14, 2022

दीड हजाराची लाच घेताना कनिष्ठ अभियंता लाचलुचपत च्या जाळ्यात

 

उस्मानाबाद - दीड हजाराची लाच घेताना कनिष्ठ अभियंता लाचलुचपत च्या जाळ्यात अडकली असून जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.राजश्री उत्तमराव शिंदे, वय 40 वर्षे, असे आरोपीचे नाव असून कनिष्ठ सहाय्यक, जि. प.बांधकाम विभाग,उप विभाग भूम जि. उस्मानाबाद या पदावर त्या कार्यरत आहेत.     

याबाबत माहिती अशी की तक्रारदाराचे वडील हे मैल कामगार म्हणून 2016 मध्ये सेवानिवृत्त झाल्यानंतर 2021 मध्ये त्यांची सुधारीत वेतननिश्चिती बाबत आदेश काढण्यात आले होते. सदर फरक रक्कम बिलाच्या रु.91257/- च्या चेकवर साहेबांची सही घेऊन देण्यासाठी आरोपीने तक्रारदार यांचेकडे 1500/- रुपयांच्या लाचेची पंचांसमक्ष मागणी करून पंचासमक्ष स्वीकारली.या कारवाई मध्ये सापळा अधिकारी: - प्रशांत संपते, पोलीस उप अधीक्षक , ला.प्र.वि . उस्मानाबाद.

मार्गदर्शक - डॉ. राहुल खाडे, पोलीस अधीक्षक, ला.प्र.वि.औरंगाबाद

मा.श्री.विशाल खांबे,अपर पोलीस अधीक्षक, ला. प्र .वि. औरंगाबाद

सापळा पथक - पोअ/ दिनकर उगलमुगले, मधुकर जाधव, अर्जुन मारकड, विशाल डोके ला.प्र.वि, उस्मानाबाद.

यांनी काम पाहिले.