दैनिक जनमत : टपाल कर्मचारी देखील संपावर, आज आणि उद्या दोन दिवस संप

Monday, March 28, 2022

टपाल कर्मचारी देखील संपावर, आज आणि उद्या दोन दिवस संप


ऑल इंडिया पोस्टल एम्प्लॉईज युनियन ग्रुप,पोस्टमन व एम.टी.एस.ग्रामीण डाक सेवक या संघटनेच्या वतीने पोस्ट ऑफिस कार्यालयासमोर दोन दिवसीय देशव्यापी संप लाक्षणिक सुरू आहे. प्रलंबित मागण्यांसाठी सरकारचे लक्ष वेधण्यासाठी व कामगार विरोधी धोरणांना विरोध करण्यासाठी हा देश देशव्यापी दोन दिवसांचा लाक्षणिक संप आहे. नवीन पेन्शन योजना रद्द करा व जुनी पेन्शन योजना त्वरित लागू करा. खाजगीकरण,फ्रॅंचाईजी, आऊटलेट,डाक मित्र योजना मागे घ्या. इतर केंद्रीय खात्यांप्रमाणे टपाल खाते ही पाच दिवसांचा आठवडा लागू करा. टपाल खात्यातील सर्व रिक्त जागा त्वरित भरा. युनियन पदाधिकारी यांना निर्मन लावणारे नियम १९६४-१५(१) ३ चे आदेश मागे घ्या.फिनॅकल सर्वरची क्षमता वाढवा, नेटवर्कसाठी एनएसपी-१ व एनएसपी-२ नेटवर्क स्पिड सुनिश्चित करा. ग्रामीण डाक सेवकांना खात्यात सामावून घ्या कमलेशचंद्रा समितीच्या सकारण सकारात्मक शिफारशी त्वरीत लागू करा. पार्सल साठी असणारे नोड डिलिव्हरी सेंटर स्पीड पोस्टसाठी असणारे सेन्ट्रल डिलिव्हरी सेंटर बंद करा. कोविड १९ च्या सर्व समस्येचे निराकरण करा कोविड मुळे मृत्यू झालेल्या कर्मचाऱ्यांना दहा लाखाचे अर्थसाह्य द्या व मयत कर्मचाऱ्यांच्या वारसांना नोकरी द्या.एचएसजी इईच्या रिक्त पदावर नियुक्तीसाठी असलेली कठोर निर्बंध शिथिल करून त्या रिक्त जागा भरा. १८ महिन्यांचा थकित महागाई भत्ता त्वरित अदा करा.आयपीपीबी खाती उघडणे बाबत, ए झेड यावर करणे, आधार कार्ड सेवा, बिझनेस डेव्हलपमेंट च्या नावाखाली अवैज्ञानिक लक्ष्य साध्य करण्यासाठी होणारी कर्मचाऱ्यांची पिळवणूक थांबवा. सर्वच स्तरावर नियमीतपणे व सर्व प्रकारच्या कामगार प्रतिनिधीच्या बैठका घ्या. टपाल खात्याचे विकेंद्रीकरण थांबवा तसेच पार्सल हब चालवण्यासाठी खाजगी व्यक्तीची करण्यात येणारी नियुक्ती थांबवा या त्यांच्या प्रमुख मागण्या आहेत.

संघटनेच्या वतीने पुकारण्यात आलेल्या संपला जिल्ह्यात शंभर टक्के प्रतिसाद भेटला आहे त्यामुळे पोस्ट सेवा पूर्ण पणे ठप्प झाली आहे.यावेळी अखिल भारतीय टपाल कर्मचारी संघटना वर्ग 3 चे सचिव कॉ.महेश वाघमोडे कॉ.बाळासाहेब कदम कॉ. भीमराव पाटील कॉ. सुरेश जगदाळे कॉ. दिनेश मेटे कॉ. लक्ष्मण टापरे कॉ. राशनकर कॉ. विष्णुदेवा सुरवसे तसेच एनऐपीईचे संघटनेचेनेचे नेते लक्ष्मण मिसाळ फुटाणे. पोस्टमन संघटना सचिव कॉ.रझाक शेख कॉ. कुबेर बोरकर एफएनपीओ पोस्टमन संघटना सचिव कॉ. खरजुले तसेच ग्रामीण डाक सेवक संघटनेचे सचिव कॉ.बाळासाहेब बुबने कॉ.अविनाश समुद्रे ,बाळासाहेब सोनवणे कॉ. बाळासाहेब बुबने कॉ. पी डी मते कॉ. महामुद पठाण आदी कर्मचारी या संपात सहभागी होते.