दैनिक जनमत : परंडा शहरातील पानटपरी फोडून १५ हजार रुपयांची चोरी

Sunday, March 6, 2022

परंडा शहरातील पानटपरी फोडून १५ हजार रुपयांची चोरी

 


परंडा (दि ६ मार्च)  परंडा शहरातील जुनी भाजी मंडई येथिल विजय चौतमहाल यांची पानटपरी अज्ञात चोरट्याने फोडून टपरीतील १५ हजार रुपयाची रोख रक्कम चोरली आहे हि घटना दि ६ फ्रेबुवारी रोजी मध्यरात्रीच्या सुमारास घडली या प्रकरणी अज्ञात चोरा विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे .

      या बाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, विजय चौतमहाल यांची जुनी भाजी मंडई येथे पाण टपरी असून विजय चौतमहाल यांनी टपरी मधील बरणीत १३ हजार ५०० रुपये ठेवले होते व गल्ल्यात १ हजार ५०० रूपये ठेवले होते . चौतमहाल यांनी नेहमी प्रमाने रात्री साडे दहा वाजेच्या सुमारास टपरी बंद करून घरी गेले होते .दि ६ रोजी मध्यरात्रीच्या सुमारास अज्ञात चोरटयाने टपरीचा सिलिंगचा पत्रा व प्लायवुड कापून टपरी मधील रोख रक्कम १५ हजाराची चोरी केली .टपरी समोरील दुकानदार संदिप पवार व नितीन पवार यांना चौतमहाल यांच्या टपरी ची खिडकी उघडी दिसल्याने त्यांना संशय आल्याने त्यांनी विजय चौतमहाल यांना माहिती दिल्याने चौतमहाल यांनी टपरी जाऊन पाहिले असता चोरी झाल्याचे दिसून आले .

    चौतमहाल यांच्या फिर्यादी वरून परंडा पोलिसात अज्ञात चोरा विरूध्द गुन्हा दाखल करन्यात आला आसुन पुढील तपास महिला पोलिस हवालदार शबाना मुल्ला करीत आहे.