दैनिक जनमत : पाच लाखांची लाच घेताना ग्रामसेवक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात

Monday, April 11, 2022

पाच लाखांची लाच घेताना ग्रामसेवक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात

 


गारगोटी. - प्रतिनिधी. 


गारगोटी येथील सयाजी कॉम्प्लेक्स गाळ्यांच्या सेपरेट नोंदी करण्यासाठी ग्रामसेवकास ५ लाख रुपयांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने आज (सोमवार) दुपारी रंगेहाथ पकडले. अमृत गणपती देसाई (सध्या रा. गडहिंग्लज, मुळगाव पेरणोली, ता. आजरा ) असे लाचखोर ग्रामसेवकाचे नाव आहे.

गारगोटी कोल्हापूर रोडवरील गोंजारी हॉस्पिटलसमोरील सयाजी कॉम्प्लेक्स गाळ्यांच्या सेपरेट नोंदणीसाठी ग्रामसेवकाकडून चालढकल सुरू होती. ग्रामसेवक अमृत देसाई याने सयाजी देसाई यांना वेगवेगळ्या ठिकाणी बोलवून वेळ काढू‌पणाचे धोरण अवलंबिले होते. नोंदणीकरिता २० लाख रुपये किंवा कमर्शियल गाळा देण्याची मागणी केली होती.तडजोडी अंती हा व्यवहार १४ लाख रुपयांना ठरला होता. सयाजी देसाई यांनी याबाबतची माहिती लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला दिल्यानंतर सापळा रचला होता. आज दुपारच्या सुमारास सयाजी कॉम्प्लेक्स मधील ऑफिसमध्ये ग्रामसेवक अमृत देसाई यास ५ लाख रुपयांची लाच घेताना रंगेहाथ पकडण्यात आले.