सोलापूर, उस्मानाबाद, कोल्हापूर,सातारा सांगली, पुणे जिल्ह्यात जाणारे दैनिक
सोलापूर कार्यालय- १६ युनायटेड ऑर्केड चेतन फौंड्री समोर होटगी रोड सोलापूर
उस्मानाबाद कार्यालय पत्ता - श्री साई संकुल कोर्टाशेजारी उस्मानाबाद
सैनिक फेडरेशनच्या पाठपुराव्याला यश ,दहा वीर नारीला, एसटी महामंडळाने दिला आजीवन मोफत प्रवास पास
उस्मानाबाद -
अमृत जवान महोत्सव 2022 याअंतर्गत उस्मानाबाद जिल्हा सैनिक फेडरेशन जिल्हाध्यक्ष बाळासाहेब जावळे यांनी उस्मानाबाद जिल्हा कलेक्टर साहेबांना निवेदन देण्यात. आले सैनिकाच्या अडीअडचणी प्रलंबित केसेस जसे की महसूल विभाग शेत रस्ते ,शेती विषयी होणारा त्रास पाटबंधारे, विभाग नगरपरिषद, कृषी विभाग पोलीस विभाग, एसटी महामंडळ यांनी अधिकारी कमिटीमध्ये नेमणूक करावी करावी व सैनिकाचे समस्या सोडवाव्यात याचा पाठपुरावा करत एसटी महामंडळाने वीर नारी यांना आजीवन मोफत पास( दहा जणांना) दिलेला आहे. श्रीमती रेहना शेख, श्रीमती सोनाली सोमवंशी, श्रीमती मीनाक्षी भिसे. श्रीमती लक्ष्मीबाई गायकवाड श्रीमती कांताबाई कदम ,श्रीमती लिता जाधव, श्रीमती रतनबाई महाडिक, श्रीमती प्रभावती निकम , श्रीमती गयाबाई सोनटक्के यांना मिळाला, यावेळी सैनिक फेडरेशन जिल्हा कार्याध्यक्ष हरिदास शिंदे, जिल्हा कार्याध्यक्ष अशोक गाडेकर, जिल्हा संघटक चंद्रकांत ओव्हाळ तसेच, बी बी भोसले , ख्वाजा शेख व तसेच तुळजापूर तालुका उपाध्यक्ष भालचंद्र कोळी उपस्थित होते .