दैनिक जनमत : मनोज आव्हाड खूण प्रकरणातील आरोपींवर कडक कारवाई करण्याची सकल मातंग समाजाची मागणी

Monday, April 25, 2022

मनोज आव्हाड खूण प्रकरणातील आरोपींवर कडक कारवाई करण्याची सकल मातंग समाजाची मागणी

उस्मानाबाद - औरंगाबाद येथील मातंग समाजातील तरुण मनोज आव्हाड यांच्या मारेक-यास फाशीची शिक्षा द्यावी या मागणीचे सकल मातंग समाजाच्या वतीने जिल्हाधिकाऱ्या मार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन दिले या निवेदनात म्हटले आहे की दि.२० एप्रिल रोजी मनोज शेषेराव आव्हाड या तरुणाने मांगीरबाबा यांच्या यात्रेला जाण्यासाठी मारेक-यास २०००/-  रूपयाची मागणी केली होती  दलित असून यात्रा वगरे करतोस जय लहुजी म्हणतोस हा राग मनात धरून मनोज यास मारेक-यांनी चोरीचा आरोप घालुन यांनी लाठ्याकाठ्यांनी गुराप्रमाणे मारहाण केली एवढी निर्दयी मारहान करण्यात आली की आठ-दहा जणांनी मिळून केलेल्या मारहाणीत मनोज याचा जागीच मृत्यु झाला. आरोपींवर तात्काळ कारवाई करावी अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा सकल मातंग समाजाच्या वतीने देण्यात आला आहे.


'दिलखुष' करणे पडले महागात, लाच घेताना घेतले ताब्यात

  उस्मानाबाद - जिल्ह्यात पंचायत समिती अंतर्गत मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचाराची प्रकरणे गेल्या काही दिवसांत गाजत आहेत.  महात्मा गांधी रोजगार हमी...