दैनिक जनमत : राष्ट्रवादी महिला काँग्रेस लातूर विभागाच्या अध्यक्ष पदी वैशाली मोटे यांची निवड

Thursday, May 5, 2022

राष्ट्रवादी महिला काँग्रेस लातूर विभागाच्या अध्यक्ष पदी वैशाली मोटे यांची निवड

 

उस्मानाबाद - राष्ट्रवादी महिला काँग्रेस लातूर विभागच्या अध्यक्ष पदी वैशाली मोटे यांची निवड करण्यात आली आहे. मुंबई येथे पत्रकार परिषदेत राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. फौजिया खान आणि नवनियुक्त प्रदेशाध्यक्ष विद्या चव्हाण यांनी ही घोषणा केली. राष्ट्रवादी काँग्रेस ची संघटनात्मक बांधणी मजबूत करण्यासाठी आणि पक्ष तळागाळापर्यंत पोहचविण्यासाठी या निवडी केल्या असल्याचे डॉ. फौजिया खान यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. या निवडीबद्दल सर्व स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.