भूम( वसिम काजळेकर) :- तालुक्यातील प्रति महाबळेश्वर वाटणाऱ्या हाडोंग्रीतील ध्यानकेंद्र येथे उद्यान पंडित पुरस्कार विजेत्या प्रभावती रेवनसिद्ध लामतुरे यांचा बाळासाहेब पाटील हाडोंग्रीकर यांच्या वतीने सत्कार करण्यात आला. तालुक्यातील हाडोंग्री येथे रविवार दिनांक ८ रोजी उस्मानाबाद जिल्हापरिषदचे माजी अध्यक्ष बाळासाहेब पाटील हाडोंग्रीकर यांच्या उपस्थीतीत आदित्य बाळासाहेब पाटील व अनुष्का आदित्य पाटिल यांच्या हस्ते उद्यान पंडित पुरस्कार विजेत्या प्रभावती रेवनसिद्ध लामतुरे यांचा सन्मान करण्यात आला यावेळी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक दत्तात्रय सुरवसे,फॉरेस्ट ऑफिसर सदानंदे,ए.वैद्यनाथ ( मॅनेजर बँक ऑफ महाराष्ट्र उ.बाद ) प्रगतशील शेतकरी विक्रम गाढवे,प्रभावती विक्रम गाढवे,ऍड.रामहरी मोटे,लता रामहरी मोटे, यांच्या प्रमुख उपस्थिती होते. यावेळी मान्यवरांनी रासायनिक शेती कडून सेंद्रीय शेती कडे येण्याची का गरज आहे. या विषयी उपस्थितांना मार्गदर्शन केले. यावेळी परिसरातील शेतकरी आणि नागरिक उपस्थित होते.
-
उस्मानाबाद - कळंब तालुक्यातील चोराखळी नजिक राष्ट्रीय महामार्ग वर झालेल्या विचित्र अपघातात महिलेचा जागीच मृत्यू झाला असून अन्य ७ जणांना उस...
-
राज्य सरकारने शासन निर्णय काढल्याने शिक्कामोर्तब मुंबई - पोलीस पाटलांना सहकारी संस्थांच्या निवडणुका लढण्याबाबत, सहकारी संस्थेत पद घेण्याबाब...
-
एलसीबी, विटा, तासगाव पोलिसांची संयुक्त दमदार कामगिरी: शेणोली स्टेशन ता.कराड येथे'त्या' महिलेसह बाळ ताब्यात : आई - वडिलांनी सोडला स...