दैनिक जनमत : जलतरण तलावात पोहायला गेलेल्या मुलाचा मृत्यू

Sunday, May 8, 2022

जलतरण तलावात पोहायला गेलेल्या मुलाचा मृत्यूउस्मानाबाद शहरात ज्ञानेश्वर मंदिराजवळ असलेल्या साईलिला हॉटेल  येथील स्विमिंग पूल मध्ये  पोहण्यासाठी गेलेल्या जियान समीर मुल्ला वय 18 वर्षे याचा दि ८ मे रोजी पाण्यात बुडून मृत्यू झाला आहे. नातेवाईकांनी स्विमिंग पूलच्या बेजबाबदारपणामुळे हा मृत्यू झाल्याची माहिती प्रसारमाध्यमांना बोलताना दिली आहे. तसेच स्विमिंग पूल चालकावर गुन्हा दाखल करण्याची मागणी आनंद नगर पोलीस स्टेशन मध्ये केली आहे.जियान हा  बार्शी येथील रहिवासी असून उस्मानाबाद येथे आजोळी सुट्टयासाठी आला होता.