दैनिक जनमत : गोआयबीबो ला ग्राहक आयोगाचा दणका

Thursday, May 5, 2022

गोआयबीबो ला ग्राहक आयोगाचा दणकाउस्मानाबाद -

जिल्हा ग्राहक आयोगाने  हवाई सेवेचे तिकीट आरक्षित करणाऱ्या गोआयबीबो या कंपनीला दंड केला आहे.

कोरोना काळात उस्मानाबाद येथील रहिवाशी असलेले एका व्यक्तींनी गोआयबीबो  ॲपवरून दि.१३ मार्च २०२० रोजी इंडिगो एअर लाईन्स या विमान कंपनीची पुणे ते दिल्ली अशी एकूण ८ जणांची जाण्याची व येण्याची दि.२० एप्रिल २०२० रोजीची तिकीटे बुक केली होती.

कोरोना काळात शासनाने आपत्ती घोषित करून सर्व देशात टाळेबंदी केली होती त्या कारणाने सर्व विमान उड्डाणे रद्द केली होती गोआयबीबो व इंडिगो एअर लाईन्स यांनी तक्रारकर्ताच्या तिकीटाची रक्कम तात्काळ जमा केली नाही त्यामुळे तक्रारकर्तांनी वेळोवळी या वरील दोन्ही कंपन्यांकडे तिकीटाची रक्कम जमा करण्याची विनंती केली होती मात्र गोआयबीबोने तक्रारकर्ता यांच्या खातेदार वालेट मध्ये दि ७ ऑक्टोबर २०२० रोजी ४४२२४ हजार रूपये जमा केली तक्रारकर्तांनी वरील दोन्ही कंपनीच्या कस्टमर केअर शी संपर्क करून तिकीटाची रक्कम ही बचत खात्यावर जमा करावी अशी विनंती केली पण गोआयबीबो व इंडिगो एअर लाईन्स यांनी ४४२२४ रूपयांपैकी ३६८० रूपये हि कनव्हीनियंस फीस कपात करण्यात आल्याचे कळविले व उर्वरित रक्कम देखील तक्रारकर्ताच्या खात्यावर जमा करायला नकार दिला व सदरील रकमेचा विनियोग देखील गोआयबीबो यांच्या मार्फत पुढील प्रवासकरिता तिकीटाचे बुकींग करून करावा लागेल असा निर्बंध घालण्यात आला. तक्रारकर्तांनी वरील दोन्ही कंपन्यांस ई-मेल करून बुकींग केलेली रक्कम  व्याजसह मिळावी याची विनंती केली पण त्यांनी ती रक्कम त्यांना अदा केली नाही  त्यामुळे तक्रारकर्तांनी ग्राहक मंच आयोगासमोर तक्रार दाखल केली.गोआयबीबो यांना तक्रारकर्तांनी ई-मेल द्वारे नोटीसची बजावणी करूनही गोआयबीबो हे आयोगासमोर उपस्थित झाले नाहीत त्यामुळे गोआयबीबो यांचे विरुद्ध एकतर्फा आदेश पारीत करण्यात. या आदेशात तिकीटाची संपूर्ण रक्कम व मानसिक व शारीरिक त्रास तक्रार अर्जाच्या खर्चापोटी ५००० रुपये देण्यात यावेत असे आदेश दिले आहेत.  तक्रारदार यांच्याकडून ॲड मनीष शहाणे यांनी काम पाहिले त्यांना ॲड. अमर चव्हाण, ॲड हर्षद देशमुख यांचे सहकार्य लाभले.