Sunday, June 5, 2022

44 लाख 35 हजार रुपये खर्चाच्या सिमेंट काँक्रीट रस्ता व नाली कामाचा भूमिपूजन सोहळा संपन्न
उस्मानाबाद - 
उस्मानाबाद नगर परिषद बांधकाम विभागाच्या वतीने विशेष वैशिष्ट्यपूर्ण योजनेअंतर्गत विकासनगर येथे 44 लाख 35 हजार रुपये खर्चाच्या सिमेंट काँक्रीट रस्ता व नाली कामाचे भूमिपूजन शिवसेनेचे खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर, शिवसेना जिल्हाप्रमुख आमदार कैलास घाडगे पाटील, माजी नगराध्यक्ष मकरंद उर्फ नंदुभैय्या राजेनिंबाळकर, नगर परिषदेचे मुख्याधिकारी हरिकल्याण येलगट्टे, मा.नगरसेवक सोमनाथ गुरव यांच्या हस्ते आज (दि.5) करण्यात आले. 

उस्मानाबाद शहरातील विकासनगर येथे अंतर्गत सिमेंट रस्ते आणि नालीच्या कामासाठी नागरिकांमधून अनेक वर्षापासून मागणी होत होती. या कामाकरिता निधी उपलब्ध करुन दिल्याबद्दल प्रभागाचे माजी नगरसेवक सोमनाथ गुरव यांनी शिवसेनेचे खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर, शिवसेना जिल्हाप्रमुख आमदार कैलास घाडगे पाटील, मा.नगराध्यक्ष मकरंद उर्फ नंदुभैय्या राजेनिंबाळकर यांचे आभार व्यक्त केले. तसेच हे काम पूर्ण झाल्यानंतर या भागातील रहिवाशांची गैरसोय दूर होणार आहे. त्यामुळे रहिवाशांमधून समाधान व्यक्त होत आहे. 

रस्त्याचे काम दर्जेदार व्हावे यासाठी प्रभागातील लोकप्रतिनिधीसह ठेकेदारानेही लक्ष द्यावे, अशा सूचना यावेळी खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांनी दिल्या. आमदार कैलास घाडगे पाटील यांनी उस्मानाबाद शहरासह उस्मानाबाद-कळंब विधानसभा मतदारसंघात विकासकामांना निधी कमी पडणार नाही असे यावेळी सांगितले. माजी नगराध्यक्ष मकरंद राजेनिंबाळकर यांनी उस्मानाबाद शहराच्या विकासासाठी आपण कटीबद्ध असून लवकरच शहराचे रुप पालटल्याचे दिसून येईल, असेही ते म्हणाले.


भूमिपूजन सोहळ्यास शिवसेनेचे माजी शहरप्रमुख प्रवीण कोकाटे,शहरप्रमुख संजय मुंडे, युवक नेते पंकज पाटील, मा.नगरसेवक बाळासाहेब काकडे, रोहित निंबाळकर, नगर अभियंता श्री.विधाते, हनुमंत देवकते, रहेमान काझी, कुणाल धोत्रीकर, गणेश राजे दशरथ भालेकर रमेश ढवळे सुखदेव भालेकर गोविंद कौलगे दिपक गणेश अजय सुपेकर  पांडू आण्णा भोसले, नितीन शेरखाने  सुमित पाटील, आकाश खटके नितीन इंगळे अभिजीत कोळी संदीप शिंदे आकाश राठोड, अशोक रुपदास, संदीप शिंदे, सत्यजीत पडवळ महेश लिमये अमोल जाधव, संदेश ढवळे, शुभम ढवळे, बापू शिंदे, आशिष साळुंके, अशोक रुपदास, विठ्ठल रुपदास,शहाजी राठोड, यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी, विकासनगर येथील महिला, पुरुष नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

ग्लोबल एज्युकेशनल इन्स्टिट्युट पिंपरखेड येथे संविधान दिन साजरा व शहीदांना आदरांजली

    परंडा - (प्रतिनिधी)परंडा तालुक्यातील पिंपरखेड येथील ग्लोबल एज्युकेशनल इन्स्टिट्युट मध्ये संविधान दिन साजरा करण्यात आला.भारतीय संविधान आण...