Wednesday, June 1, 2022

रुग्ण कल्याण समितीच्या वतीने शासकीय वैद्यकीय महाविद्यालये अधिक्षक संजय राठोड यांचा सत्कार

 


उस्मानाबाद :-  उस्मानाबाद जिल्ह्यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय उस्मानाबाद करांच्या ब-याच प्रयत्नाने सन २०२२-२३ शैक्षणिक या वर्षापासून सुरू झाले.हे महाविद्यालय शासकीय रुग्णालयातील नविन ईमारतीत चालु झाले. उस्मानाबाद शासकीय रुग्णालयाचे अधिष्ठाता (अधिक्षक) मा.संजय राठोड यांचा सत्कार रुग्ण कल्याण समितीच्या वतीने पुष्प गुच्छ देऊन करण्यात आला, वैद्यकीय महाविद्यालय चालु झाल्याने प्रशासनाचे देखिल आभार मानण्यात आले, वैद्यकीय महाविद्यालयातील सिक्युरिटी,पोलीस चौकी,वाहन पार्किंग,रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांना पिण्याच्या पाण्याची व्यवस्था यासहित इतर अन्य आवश्यक बाबींवर देखिल चर्चा करण्यात आली,यात प्रामुख्याने रुग्ण कल्याण समिती सदस्य अब्दुल लतिफ,मिशन वात्सल्य समिती सदस्य गणेश रानबा वाघमारे,सचीन चौधरी,महादेव माळी, मच्छिंद्र चव्हाण, परिचारिका  अश्विनी गोरे,अभियंता श्री शिवपुजे अन्य इतर उपस्थित होते.

माजी सभापती विनायक आबा विधाते यांचे निधन

  कारी - ( प्रतिनिधी) - तालुक्यातील कारी येथील प्रगतशील शेतकरी,बार्शी पंचायत समितीचे माजी सभापती विनायक (आबा) अनंत विधाते (वय ७५)यांचे अल्पश...