दैनिक जनमत : उस्मानाबाद जिल्ह्यकरिता दिनांक १८ ते २२ जून, २०२२ साठी कृषि हवामान अंदाज व हवामान आधारित कृषि सल्ला पत्रिका

Friday, June 17, 2022

उस्मानाबाद जिल्ह्यकरिता दिनांक १८ ते २२ जून, २०२२ साठी कृषि हवामान अंदाज व हवामान आधारित कृषि सल्ला पत्रिका

 

उस्मानाबाद - प्रादेशिक हवामान केंद्र, मुंबई कडून प्राप्त झालेल्या हवामान अंदाजानुसार उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये पुढील पाच दिवस आकाश ढगाळ राहून हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची तर दिनांक १८ जून, २०२२ रोजी तुरळक ठिकाणी मेघगर्जना, वादळी वारा (३० ते ४० कि.मी./तास) व विजांच्या कडकडाटासह हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे.