दैनिक जनमत : सलगरा प्रा. आरोग्य केंद्रात उद्या मोफत आरोग्य तपासणी शिबिर

Thursday, June 23, 2022

सलगरा प्रा. आरोग्य केंद्रात उद्या मोफत आरोग्य तपासणी शिबिर

 


नागरिकांनी सहभागी होण्याचे उपसरपंच प्रशांत लोमटे यांचे आवाहन

सलगरा,दि.२३(प्रतिक भोसले)

तुळजापूर तालुक्यातील सलगरा (दि.) येथील प्राथमिक आरोग्य केंद्र येथे राज्याचे माजी गृहमंत्री तथा माजी खा.डॉ.पद्मसिंह पाटील व तुळजापूर तालुक्याचे आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली भाजपा युवा नेते मल्हार पाटील यांच्या वाढदिसानिमित्त तेरणा पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट उस्मानाबाद यांच्या वतीने प्राथमिक आरोग्य केंद्र सलगरा (दि.) येथे उद्या दि.२४ जून रोजी सकाळी १० ते सायंकाळी ४ वाजेपर्यंत मोफत आरोग्य तपासणी शिबीर व उपचार शिबिर संपन्न होणार आहे. या शिबिराचे आयोजन सलगरा (दि.) येथील भाजपा पदाधिकारी यांच्या वतीने करण्यात आले आहे.

यामध्ये विविध प्रकारच्या आजारांवरती तपासणी होणार असून उपचार व मोफत औषध वाटप करण्यात येणार आहेत. यामध्ये या शिबिरासाठी तेरणा पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट अंतर्गत तज्ञ डॉक्टर उपस्थित राहणार आहेत. तरी सलगरा (दि.) तसेच परिसरातील जास्तीत जास्त सर्व नागरिकांनी लाभ घ्यावा असे आवाहन उपसरपंच प्रशांत लोमटे यांच्या सह भारतीय जनता पार्टी सलगरा (दि.) यांच्या तर्फे करण्यात आले आहे.