दैनिक जनमत : उस्मानाबाद जिल्हाकरिता दिनांक १५ ते १९ जून, २०२२ साठी कृषि हवामान अंदाज व हवामान आधारित कृषि सल्ला पत्रिका

Tuesday, June 14, 2022

उस्मानाबाद जिल्हाकरिता दिनांक १५ ते १९ जून, २०२२ साठी कृषि हवामान अंदाज व हवामान आधारित कृषि सल्ला पत्रिका


उस्मानाबाद - प्रादेशिक हवामान केंद्र, मुंबई कडून प्राप्त झालेल्या हवामान अंदाजानुसार उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये पुढील पाच दिवस आकाश ढगाळ राहून हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता असून दिनांक १५ जून, २०२२ रोजी तुरळक ठिकाणी मेघगर्जना, वादळी वारा (३० ते ४० कि.मी./तास) व विजांच्या कडकडाटासह मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे.