दैनिक जनमत : सलगरा प्रा.आरोग्य केंद्रात मोफत आरोग्य तपासणी व उपचार शिबिर संपन्न

Friday, June 24, 2022

सलगरा प्रा.आरोग्य केंद्रात मोफत आरोग्य तपासणी व उपचार शिबिर संपन्न

 


सलगरा,दि.२४ (प्रतिनिधी)

तुळजापूर तालुक्यातील सलगरा (दि.) येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात राज्याचे माजी गृहमंत्री तथा माजी खा.डॉ.पद्मसिंह पाटील व तुळजापूर तालुक्याचे आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली भाजपा युवा नेते मल्हार पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त

तेरणा पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट उस्मानाबाद यांच्या वतीने प्राथमिक आरोग्य केंद्र सलगरा (दि.) येथे दि.२४ जुन रोजी सकाळी १० ते सायंकाळी ४ वाजेपर्यंत मोफत आरोग्य तपासणी शिबीर व उपचार शिबिराचे आयोजन सरपंच विष्णू वाघमारे, उपसरपंच प्रशांत लोमटे, ग्रा.पं. सदस्य आणि भाजपा पदाधिकारी यांच्या वतीने करण्यात आले होते. यामध्ये विविध प्रकारच्या आजारांवरती तपासणी करून उपचार व मोफत औषध वाटप करून शिबिरामध्ये एकूण २५४ जणांची आरोग्य तपासणी करण्यात आली. 

या शिबिरासाठी तेरणा स्पेशलिटी हॉस्पिटल नेरूळ चे डॉ.अजित निले, डॉ.प्रशांत जयस्वाल, डॉ.हर्षदा मोरगे, डॉ.अनिकेत राघवर्ते, विनोद ओव्हाळ तसेच उस्मानाबाद तेरणा जनसेवा केंद्राचे रवी शिंदे, प्रविण लोहार, सौरभ रोचकरी, विशाल केदार, यांच्यासह प्रा. आरोग्य केंद्राचे डॉ. अनिल वाघमारे, डॉ.अविनाश गायकवाड, डॉ.भिसे, डॉ.जाधव, अनिता अंधारे, शीतल भालेराव, एल.एच.व्ही. रेणके, आवंतिका सुतकर (पिओ), सतीश कोळगे, प्रकाश रेड्डी, बिभीषण लोखंडे, कुणाल मस्के आदींनी परिश्रम घेतले.