दैनिक जनमत : अवैधरित्या शस्त्रे बाळगणाऱ्यांवर कारवाई

Wednesday, June 29, 2022

अवैधरित्या शस्त्रे बाळगणाऱ्यांवर कारवाईउस्मानाबाद - पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्या आदेशावरुन उस्मानाबाद जिल्हात अवैध शस्त्रे बाळगणाऱ्यांवर आज दि.29 जुन रोजी कारवाई करण्यात आली. यात मुरुम पोलीसांनी गोपनीय माहितीच्या आधारे कंटेकुर ग्रामस्थ- विकास दिलीप सातलगे यांच्या राहते घरातून धान्याचे पोत्यामध्ये लपवुन ठेवलेली अंदाजे 35 इंच लांबीची व 01 इंच रुंदिची तलवार जप्त केली आहे. सदर कामगीरी मुरुम पोलीस ठाणेचे प्रभारी सपोनि- डॉ.रंगनाथ जगताप, पोहकॉ- संजय नायकल, सुखदेव राठोड, पोकॉ- बळीराम लोंढे, अरुण वाघमारे खंडु होळकर ,ज्योती पंढरे, आफरीन मुजावर यांच्या पथकाने केली आहे.

 तर कळंब विभागाचे सहायक पोलीस अधीक्षक एम. रमेश यांच्या मार्गदर्शनाखाली कळंब पोलीसांनी सावरगाव (पु.), कळंब येथील अमोल हरीभाऊ पवार यांच्या घरातून एक धारदार तलवार जप्त केली असून ही कारवाई कळंब पो.ठा. चे पोनि- जाधव, पोना- सोनटक्के, वाघमोडे, पोकॉ- जाधव यांच्या पथकाने केली आहे.

त्याबाबत विकास सातलगे व अमोल पवार या दोघांविरुध्द शस्त्र अधिनियम कलम- 4(25), सह म.पेा.कायदा कलम 135 अंतर्गत मुरुम व कळंब पोलीस ठाण्यात आज दि. 29 जून रोजी गुन्हा नोंदवला आहे.