दैनिक जनमत : चोरीच्या स्मार्टफोनसह आरोपी ताब्यात

Tuesday, June 28, 2022

चोरीच्या स्मार्टफोनसह आरोपी ताब्यातउस्मानाबाद -  येथील रियाज गफुर शेख, व्यवसाय- पत्रकार, वय 43 वर्षे हे दि. 05.05.2022 रोजी 02.00 ते 05.00 वा. दरम्यान घरासमोरील अंगणात झोपलेले असतांना त्यांच्या उषाजवळील रियलमी कंपनीचा स्मार्टफोन अज्ञात व्यक्तीने चोरुन नेला होता. यावरुन रियाज शेख यांनी दिलेल्या प्रथम खबरेवरुन उस्मानाबाद (ग्रा.) पो.ठा. येथे गुन्हा क्र. 66/2022 हा भा.दं.सं. कलम- 379 अंतर्गत नोंदवला आहे.

            गुन्हा तपासादरम्यान स्थानिक गुन्हे शाखेच्या पोनि- श्री. रामेश्वर खनाळ यांच्या मार्गदर्शनाखाली पाहेकॉ- विनोद जानराव, धनंजय कवडे, पोना- नितीन जाधवर, शैला टेळे,अजित कवडे, काकडे यांच्या पथकाने तांत्रीक विश्लेषण व गोपनीय माहितीच्या आधारे नमूद गुन्ह्यातील स्मार्टफोनसह जागजी, ता. उस्मानाबाद येथील राम दिलीप मगर यास ताब्यात घेउन पुढील कारवाइकीमी उस्मानाबाद (ग्रा.) पोलीस ठाण्याच्या ताब्यात दिले आहे.