दैनिक जनमत : अवैधरित्या तलवार बाळगणाऱ्यावर गुन्हा दाखल

Sunday, June 19, 2022

अवैधरित्या तलवार बाळगणाऱ्यावर गुन्हा दाखल


उस्मानाबाद -पारधी पिढी, उस्मानाबाद येथील अशोक रामा काळे उर्फ शाकाल, वय 40 वर्षे हे मालाविषयी गुन्हा करण्याच्या उद्देशाने तसेच दहशत पसरविण्याच्या उद्देशाने आपल्या घरात एक तलवार बाळगुन असल्याची गोपनीय खबर स्था.गु.शा. च्या पथकास मिळाली. यावर स्था.गु.शा. च्या पोनि- श्री. खनाळा यांच्या मार्गदर्शनाखाली पोना- सय्यद, चव्हाण, पोकॉ- आरसेवाड, सहाणे यांच्या पथकाने दि. 18 जून रोजी अशोक काळे यांस त्यांच्या घरुन ताब्यात घेउन तलवार जप्त केली आहे