दैनिक जनमत : तुळजापूर शहरात भीषण अपघात दोन जण जागीच ठार

Wednesday, June 15, 2022

तुळजापूर शहरात भीषण अपघात दोन जण जागीच ठारतुळजापूर, दि.15 (प्रतिनिधी) :

तुळजापूर शहरात उस्मानाबाद रोडवर बुधवार (दि.15 ) रोजी दुचाकी वाहनास कंटेनरने धडक दिल्याने दोन्ही जण जागीच ठार झाले.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार उस्मानाबाद कडून तुळजापूरकडे येणारा कंटेनर नंबर जी.जे. 36 व्ही. 4933 हा येत असताना आपसिंगा रोडहुन दोन चाकी वाहनावर गाडी नंबर एम.एच. 25 ए.टी. 7111 हे शहराकडे येत असताना कंटेनरची धडक बसल्याने दोघे जण जागीच ठार झाले. विशेष म्हणजे यातील एकास जवळपास पन्नास फूट रोडवर घासलेले त्यामुळे त्या व्यक्तीचे अशी अवस्था झाली की, त्याची ओळख लवकर पटली नाही. कैलास पवार व दत्ता जगताप हे दोघेही रा.तुळजापूर येथील असून ते जागीच ठार झाले. या घटनेमुळे शहरात शोककळा पसरली. अपघात घटनेची वार्ता कळताच घटनास्थळी पोलीस दाखल होऊन त्यांनी या घटनेचा पंचनामा केला व प्रत्यक्षदर्शीकडुन सविस्तर माहिती घेतली.  उस्मानाबादहुन येणाऱ्या वहानासाठी सोलापूर लातूरकडे जाणारे रस्ते बायपास असूनही अनेक जड वाहने शहरातून जातात. याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष असल्याने शहरात अपघात घडतात नावालाच बायपास रस्ता झाला अशी चर्चा नागरिकांमधून होत आहे.