दैनिक जनमत : अवैध गुटखा बाळगणाऱ्यावर गुन्हा दाखल

Tuesday, July 5, 2022

अवैध गुटखा बाळगणाऱ्यावर गुन्हा दाखल

 


 

उस्मानाबाद - अवैध गुटखा विक्री, वाहतूक या संबंधी कारवाई करणेकामी स्थानिक गुन्हे शाखेचे पथक काल दि. 04 जुलै रोजी उस्मानाबाद शहरात गस्तीस होते. दरम्यान पथकास गोपनीय माहिती मिळाली की, काकानगर, उस्मानाबाद येथील जुबेर रज्जाकसाब निचलकर हे आपल्या राहत्या घरात मानवी आरोग्यास हानिकारक असलेला महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधीत केलेला गुटखा विक्रीच्या उद्देशाने बाळगून आहेत. लागलीच पथकाने नमूद ठिकाणी छापा टाकून निचलकर यांच्या घरातून महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधीत केलेला 29,214 ₹ किंमतीचा गुटखा व तंबाखुजन्य पदार्थ जप्त केला असून निचलकर यांच्याविरुध्द आनंदनगर पो.ठा. येथे गुन्हा क्र. 190/2022 हा भा.दं.सं. कलम- 328, 188, 272, 273 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

            सदर कामगिरी स्था.गु.शा. चे पोनि- रामेश्वर खनाळ यांच्या मार्गदर्शनाखालील सपोनि- शैलेश पवार, पोहेकॉ- हुसेन सय्यद, पोना- अमोल चव्हाण, शैला टेळे, पोकॉ- साईनाथ आशमोड, रविंद्र आरसेवाड यांच्या पथकाने केली आहे.