दैनिक जनमत : ज्ञानवृक्षाचा शतकपूर्ती महोत्सव व माजी विद्यार्थी मेळावा पारा शाळेत संपन्न

Friday, December 23, 2022

ज्ञानवृक्षाचा शतकपूर्ती महोत्सव व माजी विद्यार्थी मेळावा पारा शाळेत संपन्न

 राजेश भराटे यांच्या ४५ व्या चालू घडामोडी पुस्तकाचे केले प्रकाशन

पारा (राहुल शेळके ):उस्मानाबाद जिल्ह्यातील वाशी तालुक्यातील जिल्हा परिषद पारा शाळेस यावर्षी 100वर्ष यशस्वी पूर्ण झाले.त्यानिमित्ताने 

"आम्ही पारेकर प्रतिष्ठान पारा, जि. प. केंद्रीय प्राथमिक शाळा पारा, व शाळा व्यवस्थापन समिती पारा" यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित,ज्ञानवृक्षाचा शतकपूर्ती महोत्सव व माजी विद्यार्थी मेळावा 'गौरव माझ्या शाळेचा, सन्मान करू विद्यार्थ्यांचा 'हा कार्यक्रम दि.23डिसेंबर शुक्रवारी हा सोहळा संम्पन्न झाला.यां कार्यक्रम प्रसंगी 

 प्रमुख उपस्थिती म्हणून एम. रमेश (भा.पो.से.)सहाय्यक पोलीस अधीक्षक कळंब उस्मानाबाद , प्रांजल शिंदे( मुख्य कार्यकारी अधिकारी), जि.प.उस्मानाबाद, सुरेश बुधवंत(पोलीस निरीक्षक वाशी ), सुभाष शिनगारे (पोलीस निरीक्षक माटुंगा मुंबई ),श्री. भारत बन ( गटशिक्षणाधिकारी पं. स. वाशी), कासेकर (प्रभारी गटविकास अधिकारी वाशी )या मान्यवरांच्या उपस्थितीत हा सोहळा सम्पन्न झाला.

         यावेळी सहाय्यक पोलीस अधीक्षक एम. रमेश आणि मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती प्रांजल शिंदे यांनी उपस्थितांना मोलाचे मार्गदर्शन केले.यावेळी स्वप्नाली भराटे यांचे दुःखी गंगा हे पुस्तकं तसेच राजेश जीवन भराटे यांचे 45वे वार्षिकी चालू घडामोडी 2023यां पुस्तकांचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी विदयार्थ्यांनी महाराष्ट्र दर्शन गीत सादर करून उपस्थितांची मने जिंकली.यां कार्यक्रमात 100वर्षात यां शाळेतून शिकून गेलेल्या जास्तीत जास्त माजी विद्यार्थ्याचा यावेळी गौरव करण्यात आला.

          यावेळी सरपंच राजेंद्र काशिद, शाळेचे मुख्याध्यापक मोटे,शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष विठ्ठल डोरले, उपाध्यक्ष, सदस्य,आम्ही पारेकर प्रतिष्ठान चे अध्यक्ष विष्णू हिंगणे, उपाध्यक्ष रघुनाथ भराटे, किशोर पानसे, मधुकर कुरुंद, सखाराम धुमाळ, श्रीराम शेळके, सखाराम भराटे सर्व सदस्य, गावकरी, शाळेचे सर्व माजी विध्यार्थी उपस्थित होतें. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आयुब शेख सर  यांनी तर आभार किशोर पानसे सर यांनी मानले.

'दिलखुष' करणे पडले महागात, लाच घेताना घेतले ताब्यात

  उस्मानाबाद - जिल्ह्यात पंचायत समिती अंतर्गत मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचाराची प्रकरणे गेल्या काही दिवसांत गाजत आहेत.  महात्मा गांधी रोजगार हमी...