दैनिक जनमत : माजी सभापती विनायक आबा विधाते यांचे निधन

Monday, December 5, 2022

माजी सभापती विनायक आबा विधाते यांचे निधन

 

कारी - ( प्रतिनिधी) -तालुक्यातील कारी येथील प्रगतशील शेतकरी,बार्शी पंचायत समितीचे माजी सभापती विनायक (आबा) अनंत विधाते (वय ७५)यांचे अल्पशा आजाराने (दि०६)रोजी मंगळवारी पहाटे तीन वाजता निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर दुपारी ४वाजता शेतात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.त्यांच्या पश्चात तीन मुली एक मुलगा, नातवंडे असा परिवार असून कारी गावचे उपसरपंच खासेराव विधाते यांचे ते वडील होत तसेच निवृत्त उपविभागीय पोलीस अधिकारी मोहन विधाते, जिल्हा फेडरेशन चे तानाजी विधाते,व बजरंग विधाते  यांचे ते भाऊ होते.