दैनिक जनमत : अवैध पिस्तुल व दोन जिवंत काडतुसासह एक आरोपी अटक

Tuesday, December 13, 2022

अवैध पिस्तुल व दोन जिवंत काडतुसासह एक आरोपी अटक

 


उस्मानाबाद - शहरात अवैध पिस्तुल व दोन जिवंत काडतुसासह एक आरोपी अटक करण्यात आली आहे.स्था.गु.शा. च्या पथकास गुप्‍त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, दि. 12 डिसेंबर रोजी उस्मानाबाद शहरातील बायपास रस्त्यालगतच्या हॉटेल साईकमलसमोर अंगावर पिवळसर सदरा व करड्या रंगाची विजार परिधान केलेला एक इसम अवैध पिस्तुल विक्रीसाठी येणार आहे. यावर स्था.गु.शा. चे पोनि- यशवंत जाधव यांनी पोलीस अधीक्षक, अतुल कुलकर्णी यांना सदर माहिती कळवून त्यांच्या मार्गदर्शनाखाली स्था.गु.शा. चे एक पथक नमूद ठिकाणी सापळा लाउन होते. यावर सायंकाळी 19.00 वा. सु. नमूद हॉटेलसमारे बातमीतील नमूद वर्णनाचा एक इसम आल्याने पथकाने संशयावरुन त्याची विचारपुस केली असता त्याने त्याचे नाव- किशोर लिंबराज माळी, वय 34 वर्षे, रा. चिलवडी, ता. उस्मानाबाद असे सांगीतले. तो पथकास पाहुन गांगरल्यासाखा झाल्याने पथकाने त्याची पंचासमक्ष अंगझडती घेतली असता त्याच्या ताब्यात देशी बनावटीचे लोखंडी धातुचे पिस्तुल व 2 जिवंत काडतुसे असा एकुण अंदाजे 17,400 ₹ किंमतीचे पिस्तुल व काडतुसे मिळाले. यावर पथकाने त्यास अटक करुन त्याच्या ताब्यातील नमूद पिस्तुल व काडतुसे जप्त करुन त्याच्याविरुध्द आनंदनगर पो.ठा. येथे गुन्हा क्र. 361/2022 हा शस्त्र कायदा कलम- 3/25 अंतर्गत नोंदवण्यात आला असुन पुढील तपास आनंदनगर पो.ठा. चे सपोनि- खरड हे करत आहेत.

सदरची कामगीरी पोलीस अधीक्षक, अतुल कुलकर्णी व अपर पोलीस अधीक्षक,  नवनीत काँवत यांच्या मार्गदर्शनाखाली स्था.गु.शा. चे पोनि- यशवंत जाधव, पोउपनि- संदीप ओहोळ, पोलीस अंमलदार- समाधान वाघमारे, विनोद जानराव, फरहान पठाण, नितीन जाधवर, अजित कवडे, बबन जाधवर यांच्या पथकाने केली आहे.