|
येथील आदर्श महिला नागरी सहकारी पतसंस्थेच्या २०१७ च्या दिनदर्शिकेचे प्रकशन संस्थेच्या जेष्ठ सदस्य निर्मला कुलकर्णी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी संस्थेच्या अध्यक्षा जयश्री भुसारे, सचिव संजिवनी कपाळे, तज्ञ संचालक एच. व्ही. भुसारे व टी. एम. कपाळे व संस्थेच्या व्यवस्थापिका सविता विभुते यांची प्रमुख उपस्थिती होती.अगदी थोड्याच कालावधीत नावारुपास आलेल्या आणि महिलासाठीच चालविण्यात येणाNया आदर्श महिला नागरी सहकारी पतसंस्थेच्या २०१७ च्या दिनदर्शिकेचे प्रकाशन संस्थेच्या जेष्ठ सदस्या निर्मला कुलकर्णी यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. संंस्थेच्या कार्यालयात करण्यात आलेल्या या प्रकाशन समारंभासाठी संचालीका अनिता चिल्लाळ, नंदा घाडगे, संगिता तिर्थकर, संगिता स्वामी यांच्यासह संस्थेचे सभासद, खातेदार मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी संस्थेच्या कर्मचारी अर्चना पाटील, शितल मंडोळे, दिपा विभुते, महेश डावखरे आदिंनी परिश्रम घेतले.
|
|
|