बचावात्मक खेकडा प्रवृत्ती

बचावात्मक खेकडा प्रवृत्ती 
खेकडा प्रवृत्ती मानवी जिवनात विकासाला खिळ घालते हे सर्वांनी महिती असते मात्र खेकड्यांचा वापर एखाद्याला वाचवण्यासाठी किंवा त्याच्या कृत्यावर पांघरूण घालण्यासाठी केला जाणे हे अजबच म्हणावे लागेल. रत्नागिरी जिल्ह्यातील तिवरे धरणे फुटले त्यात 18 जणांचा जिव गेला धरणफुटीचे दोषी अजून ठरायचेत यात दोषी ज्याने धरण बांधले तो असू शकतो आणि गावकर्‍यांनी तक्रार करूनही ज्यांनी योग्य दखल घेतली नाही असे अधिकारी होऊ शकतात. हे धरण शिवसेनेच्या आमदारांच्या काळात बांधले गेले. त्यांच्या संबंधातील व्यक्तीनीच हे धरण बांधले आहे. दोषी आढळल्यास संबंधीतावर कारवाई व्हावी  ही प्राथमिक भुमिका सर्वांचीच असते. मात्र सत्ताधाऱ्यांकडून हे धरण खेकड्यामुळे फुटलय असे तर्क लावण्यात येत आहेत. यातून संबंधित कंत्राटदारला वाचवण्याचा प्रयत्न केला जातो आहे. धरण आघाडी सरकारच्या काळात बांधले गेलय याला ते जबाबादार कितपत यापेक्षा जे सध्या ज्यांचे सरकार आहे त्यांनी याबाबत काय केले हे महत्वाचे आहे. पुणे जिल्ह्यात असेच धरण फुटल्यानंतर ते उंदरामुळे फुटल्याचा कयास बांधला होता. महाराष्ट्राला जलक्रांतीची परंपर आहे. इथल्या राज्यकर्त्यांनी बांधलेली धरणे कधी फुटली नाहीत त्यापैकी अनेक धरणे आजही सुस्थितीत आहेत. इंग्रजांनी बांधलेली पूल, इमारती आजही चांगल्या स्थितीत आहेत. लोकशाहीत अभाव आहे नियोजनाचा. कंत्राटदार पोसणे हा सत्ताधाऱ्यांचा धर्म बनला आहे त्यामुळे त्यांना वाचवण्यासाठी वेगवेगळे तर्क लावले जातात. कोंढव्यातील घटनेनंतर तात्काळ संबंधित बांधकाम व्यावसायिकावर गुन्हा दाखल झाला मात्र या कंत्राटदाराचा सत्ताधाऱ्याशी संबंध असणे यामुळे गुन्हा दाखल न होणे यातच सगळे काही समजून घेता येईल.  उच्चस्तरीय समीती चौकशी करेल मात्र सत्ताधाऱ्यांकडून कंत्राटदाराच्या बचवासाठी प्रयत्न केले जाणे हे दुर्दैव आहे. भारतात अनेक मोठ मोठी धरणे आहेत काही धरणे अतिरेक्यांच्या हिटलिस्टवरही असतात. उंदीर आणी खेकड्यामुळे धरणे फुटत असतील तर त्यांच्यापासून धोका आहे असे म्हणने हास्यास्पद आहे. खेकडे जलसंस्कृतीतल एक घटक आहेत. पाय ओढण्याची वृत्ती खेकड्याची असते. धरण फुटणे याला जबाबदार प्रशासनातील अधिकारी आहेत ज्यांनी जनतेच्या तक्रारीकडे दुर्लक्ष केले आहे अशा अधिकार्‍यांवर कारवाई व्हीवीच.

No comments:

Post a Comment