विकास विना गाव झाले भकास डिजिटल नेते करायला निघालेत सोशल मीडियावरुन विकास
लतीफ मामा शेख नळदुर्ग :- विकास विना गाव झाले भकास डिजिटल नेते करायला निघालेत सोशल मीडिया व वर्तमानपत्राच्या माध्यमातून मतदारसंघाचा विकास अशी अवस्था तुळजापूर विधानसभा मतदारसंघाची झाली असून त्यात प्रमुख्याने तुळजापूर तालुक्यातील नळदुर्ग शहराची झाली आहे. आगामी विधान सभेची निवडणूक जवळ येत असल्याने आमदारकीचे स्वप्न पाहून सोशल मीडिया वरून प्रसिद्धी करून घेणारे काही तथाकथित पोस्टरबॉय असलेले डिजिटल नेते आपल्या बगलबच्चे सोबत घेऊन मतदारसंघात  प्रकट झाले आहेत. व निवडणुकीसाठी जोरदार तयारी सुरू केली आहे. मात्र मागील काही निवडणुकीत आश्वासनांची खैरात करीत घोषणेचा पाऊस पडलेल्या या नेत्यांपैकी कुणाकडेही जनतेच्या दरबारात जाऊन मताचा जोगवा मागण्याकरिता ठोस विजन नसल्यामुळे देखाव्याच्या बाजार मांडीत मतदारांना वेगवेगळ्या प्रकारचे आमिष दाखवत असल्याचे चित्र दिसत आहे . कारण तालुक्यातील अनेक भागात रस्ता, गटार, पाणी, लाईट व सार्वजनिक शौचालय सारख्या मूलभूत सुविधा देण्यात बहुतेकजण अपयशी ठरले आहेत .हि अवस्था केवळ ग्रामीण अथवा शहरी भागापुरती मर्यादित नसून ज्या भागातून हे लोक निवडून आलेला आहोत किंवा त्यांच्या तब्येत सत्ता आहे त्या भागाचा देखील विकास या नेत्यांनी केले नाहीत. तर काहीजण केवळ आश्वासने व उदघाटन करून पोस्टर बॉय ची भूमिका निभावली आहे. काही ठिकाणी रस्ता व गटारीच्या कामे अनेक वर्षापासून न केल्याने गटारीचे पाणी रस्त्यावरून वाहून चिखल व खड्डे पडल्यामुळे गर्भवती महिला, वयोवृद्ध  लोकांना चलने फिरने देखील अवघड झालेले आहे. त्यामुळे रस्त्यात चिखल की चिखलात रस्ता असा प्रश्न निर्माण होत आहे तर काही ठिकाणी पोल असून लाईट नाही ,बोर असून पाणी नाही तर काही ठिकाणी पाच दिवस आड पाणी नळाला येत असल्याने धरण उशाला पाणी नाही घशाला अशी अवस्था झाली आहे. कब्रस्तान, स्मशानभूमीच्या वॉल कंपाऊंड प्रश्न असो, महामार्ग लगत असलेल्या मोठ्या गावात बस स्टँड नसल्याने प्रवाशांना हिवाळा, पावसाळा व उन्हाळ्यात रस्त्यावरच बस ची वाट पाहत थांबण्याची वेळ येते, अनेक गावात सार्वजनिक शौचालय नाहीत त्यामुळे लोक रस्त्यावरच शौचास बसतात त्यामुळे डिजिटल विकास केला म्हणणार्‍यांना एक चपराक आहे आणि त्याला सर्वच राजकीय पक्षांच्या नेत्यांची नकारात्मक मानसिकता जबाबदार आहे. पूर्वी निवडणूकीतील वाद-विवाद हेवेदावे मतदान होई पुरतेच मर्यादित होते. मात्र आज तशी परिस्थिती दिसत नाही.कारण निवडणुक लढविण्यासाठी इच्छुक असलेल्या तालुक्यातील काही राजकीय नेते सूडबुद्धीचा राजकारण करीत असल्याने अनेक गावांमध्ये विकास कामात अडथळे निर्माण झाले आहेत हि वस्तुस्थिती आहे त्याला कोणीही नाकारू शकत नाही विधानसभेसाठी इच्छुक असलेल्या नेत्यांपैकी काही जणांनी आमदारकी, जिल्हा परिषद, नगरपालिका, पंचायत समिती, ग्रामपंचायतीच्या माध्यमातून निवडून येऊन सत्ता भोगली आहे. तर काहीजण आपल्या ताब्यात असलेल्या संस्थांचे बाहेर बसून कामकाज पाहत आहेत. मात्र तालुक्यातील  नळदुर्ग व परिसरातील गावांचे म्हणावा तसा विकास झालेला नाही. त्याला सर्वच राजकीय नेते जबाबदार आहेत. आज सर्वात महत्त्वाचा प्रश्न रोजगाराचा आहे. सत्तेत असलेल्या व नसलेल्या कोणत्याही पक्षाच्या राजकीय नेत्यांनी मनावर न घेतल्यामुळे     या भागात मोठे उद्योगधंदे येऊ शकले नाहीत. जे होते ते बंद पडले त्यामुळे बेरोजगारांची संख्येत मोठ्या प्रमाणात भर पडली. बँक कर्ज देत नाही, नोकरी मिळत नाही, नवीन उद्योगधंदे सुरू होतील याची गॅरंटी नाही. त्यामुळे आज शेकडो सुशिक्षित बेरोजगार तरुणांनी गाव सोडून रोजगाराच्या शोधात मुंबई, पुणे सारखे शहरांमध्ये जाऊन मिळेल ते काम करीत आहेत. हाच का तो 21 व्या शतकातील डिजिटल विकास ज्याच्या मध्ये रोजगारासाठी  गावोगावी वणवण भटकंती करावी लागत आहे. त्याला  जबाबदार कोण ? दहा पैशाचा काम करून एक रुपयाचा देखावा करीत लहान मोठे कार्यक्रम घेऊन सोशल मीडिया व वर्तमानपत्रातून स्वतःचे उदोउदो करून घेणाऱ्या पोस्टरबॉय नेत्यांनी कारखाने उघडुन अथवा चालून किती जणांना रोजगार दिले ? तालुक्यात व स्वतःच्या गावात, शहरात  रस्ता, गटार, पाणी व लाईट सारख्या मूलभूत सुविधांसाठी निधी उपलब्ध असताना विकासाचे कोणते काम करून दिवे लावले ? सतत कट कारस्थान करून व्यापाराना उद्ध्वस्त करण्याचे काम करणाऱ्या नेत्यांनी एखादी एमआयडीसी अथवा बाजारपेठ का उभी केली नाही ?  या सर्व प्रश्नांचे उत्तर न देता गाव भकास केलेल्या काही डिजिटल नेत्यांनी आगामी विधानसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून खोटे बोल पण रेटून बोल म्हणत फोटोसेशन करून सोशल मीडियाच्या माध्यमातून खोटा प्रचार करीत गुडघ्याला बाशिंग बांधून निवडणुकीच्या आखाड्यात उतरण्यास सुरुवात केली आहे वास्तविकता अशी आहे की कोणी कितीही विकासाचे दावे करीत असले तरी तालुक्यासह मतदारसंघाचा आज पर्यंत म्हणावे तसे विकास झालेला नाही. आणि तालुक्यातील सर्व नेते जरी  विकासाबाबतीत आरोप-प्रत्यारोप करीत एकमेकाकडे बोट दाखवत असले तरी त्यांचे स्वतःच्या गावाचा विकास न केल्याने गाव भकास झाला आहे सत्ता असताना जे लोक स्वतःच्या वार्डाचे, प्रभागाचे व आपण राहत असलेल्या गावाचे विकास करू शकत नाही ते तुमचा व मतदारसंघाचा विकास काय करतील याचा गांभीर्याने विचार करणे गरजेचे आहे. कारण या मतदारसंघातील लोकांचा सर्वच राजकीय पक्षाच्या नेत्यांनी निवडणुकीच्या काळात मतदानासाठी वापर करून घेतलंय पुन्हा त्यांना वाऱ्यावर सोडण्याचे प्रकार केल्याचे अनेक उदाहरणे आहेत. त्यामुळे यावेळी विधानसभेच्या निवडणुकीत सर्व जाती धर्मातील लोकांना सोबत घेऊन सर्वसामान्य माणसाचे प्रश्न सोडविणारा नेता तुळजापूर विधानसभा मतदारसंघातील जनतेस मिळणार का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

No comments:

Post a Comment