महाळंगी ता.जि.उस्मानाबाद येथे भाजपा शाखाचे उद्घाटनदि०१ऑगस्ट२०१९ रोजी महाळंगी ता.जि.उस्मानाबाद येथे भारतीय जनता पार्टीच्या शाखाचे उद्घाटन भाजपा जिल्हाध्यक्ष दत्ताभाऊ कुलकर्णी यांच्या हस्ते करण्यात आले.कार्यक्रम प्रसंगी बोलताना भाजपाचे जिल्हाध्यक्ष दत्ताभाऊ कुलकर्णी यांनी केंद्र सरकार व राज्य सरकारने केलेल्या कामाबद्दल माहिती सांगून शासनाच्या योजना ह्या जनसामान्यां पर्यंत पोहचवण्याचे काम कार्यकर्त्यांनी करावे असे आवाहन ही यावेळी केले. यावेळी प्र का सदस्य तथा मराठवाडा सदस्य नोंदणी प्रमुख नितीन काळे प्र का सदस्य अँड.अनिल काळे, व्यंकटराव गुंड, जिल्हा उपाध्यक्ष रामदास कोळगे, अँड.नितीन भोसले, जिल्हा चिटणीस तथा जिल्हा सदस्य नोंदणी प्रमुख इंद्रजित देवकते, जि.प.सदस्य ज्ञानदेव राजगुरू,तुळजापूर विधानसभा विस्तारक शिवाजी गिड्डे,यांची प्रमुख उपस्थिती होती..
या प्रसंगी नितीन काळे प्र का सदस्य अँड.अनिल काळे, व्यंकटराव गुंड, जिल्हा उपाध्यक्ष रामदास कोळगे,जि.प.सदस्य ज्ञानदेव राजगुरू यांनी मार्गदर्शन केले.याप्रसंगी उस्मानाबाद ग्रामीण तालुकाध्यक्ष दत्तात्रय सोनटक्के, उस्मानाबाद कळंब विधानसभा विस्तारक मकरंद पाटील,महाळंगी शाखाप्रमुख व्यंकट जाधव, सचिव प्रशांत ढवळे, मार्गदर्शक नागनाथ जाधव, उपाध्यक्ष मंगेश गुंड, सहसचिव बाळासाहेब जाधव, कोषाध्यक्ष नितीन आगळे, सदस्य विमलचंद जाधव, सदस्य ताजुद्दीन शेख आदी मान्यवर उपस्थित होते.                                                                                                                             या कार्यक्रमाचे संयोजन नागनाथ जाधव, सुत्रसंचलन शिवाजी गिड्डे आभार व प्रास्ताविक शाखेचे अध्यक्ष व्यंकट जाधव यांनी केले.

No comments:

Post a Comment