पूरस्थितीला सरकारचा भोंगळ कारभार जबाबदार - अजित पवार


 पूरस्थितीला सरकारचा भोंगळ कारभार जबाबदार असल्याचा आरोप माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पत्रकार परिषदेत केला आहे
अलमट्टी धरण हे कोयना धरणापेक्षा ४ पटींनी मोठं आहे. त्यातल्या पाण्याचा विसर्ग होणं अत्यंत गरजेचं आहे. याबाबतची आगाऊ सूचना मुख्यमंत्र्यांनी  कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांना द्यायला हवी होती. परिणामी, नद्यांमध्ये पाण्याचा फुगवटा निर्माण होऊन महाराष्ट्रात पूरस्थिती निर्माण झाली आहे.
वास्तविक, राज्याचा प्रमुख या नात्यानं मुख्यमंत्र्यांनी मुंबईच्या मुख्यालयात बसून राज्यातल्या जिल्हाधिकाऱ्यांच्या संपर्कात राहायला हवं होतं. सातत्यानं सर्वच धरणांमधल्या पाण्याच्या पातळीचा आढावा घ्यायला हवा होता. त्यामुळे राज्यातल्या पूरस्थितीला या सरकारचा भोंगळ कारभार जबाबदार असल्याचा आरोप पवार यांनी केला आहे.

Post a Comment

Previous Post Next Post