खा.ओमराजे धर्मसंकटात?

उस्मानाबाद - विधानसभेची आचारसंहिता येत्या काही दिवसांत लागणार आहे. तत्पूर्वीच जिल्ह्यातील राजकारण तापले आहे. महाराष्ट्रात सर्वाधिक रोमांचक लढाई उस्मानाबाद- कळंब मतदार संघात होईल असा चंग बांधला जात आहे. आ. राणाजगजितसिंह पाटील यांनी राष्ट्रवादीची साथ सोडत 'सबका साथ सबका विकास' अशी आरोळी उठवत भाजपचा झेंडा हाती घेतला. पाटील यांच्या भाजप प्रवेशाला त्यांचे पारंपरिक विरोधक खा. ओमराजे यांनि कडाडून विरोध केला. भाजप- शिवसेना युतीत उस्मानाबाद मतदारसंघ शिवसेनेकडे आहे. मात्र पाटील यांनी प्रवेश करताना तो भाजपकडे राहील आणि उमेदवारी आपल्यालाच मिळेल याची चाचपणी केली होती. भाजपनेही उस्मानाबाद मतदारसंघ आपल्याकडे रहाण्यासाठी जोरदार तयारी  केली आहे. पाटील यांना उमेदवारी दिल्यास ओमराजे त्यांचा प्रचार करतील की नाही  असा प्रश्न भाजप नेतृत्वाला पडत आहे. उस्मानाबाद -कळंब मतदार संघात ओमराजे यांचा संपर्क दांडगा आहे. राणा पाटील यांना तुळजापूर मतदारसंघात उमेदवारी दिल्यासही उस्मानाबाद तालुक्यातील ७२ गावे मतदारसंघात आहेत तेथेही ओमराजेंचा संपर्क चांगला आहे. पाटील विरोधातील गट सतत त्यांच्या संपर्कात आहे. त्यांनी पाटील यांचा  प्रचार न केल्यास फटका बसू शकतो याची जाणीव भाजप नेत्यांना आहे. मात्र लोकसभा निवडणुकीत भाजपने तन-मन लावून ओमराजेंचा प्रचार केला आहे. खुद्द पंतप्रधानांनी त्यांच्यासाठी औसा येथे सभा घेतली होती. लोकसभेच्या सबंध प्रचारात ओमराजे  यांनी भाजप सरकराचे तोंडभरून कौतुक केले होते. भविष्यात केंद्रातील योजनांसाठी त्यांना भाजपची साथ लागणार आहे. पाटील यांचा प्रचार करावा की नाही, विरोध केला तर मित्र पक्षाला फटका बसू शकतो. भविष्यात भाजप कितपत मदत करेल याची शाश्वती नाही हे धर्मसंकट ओमराजेंपुढे उभे टाकले असल्याची चर्चा आहे.

आकाश नरोटे 
दैनिक जनमत
८४२१५३१९७६

No comments:

Post a Comment