राणा दादांसाठी कार्यकर्त्यांच्या भावनिक पोस्ट
उस्मानाबाद जिल्ह्यातील राजकीय वातावरण तापू लागत असतानाच राणाजगजितसिंह पाटील यांच्या कार्यकर्त्यांकडून सोशल मिडीयावर भावनिक पोस्ट टाकल्या आहेत. सतिश दंडनाईक, स्वानंद पाटील, मनगोत शिनगारे या पाटील समर्थकांनी ही पोस्ट शेअर केली आहे.

काय आहे हे भावनिक आवाहन
आजपासून मोजून ३० दिवस बाकी आहेत मित्रांनो, भावांनो...

दादांची ही निवडणूक आहे, याआधी जे काही केलंय त्याबद्दल दुमत कोणाचे असण्याचं कारण नाहीच पण यावेळी जे काही करायचे आहे ते महत्वाचे आहे,  आणि ती वेळ आताच आहे, आणि हीच आहे...

जो आपल्यासाठी राबतो.. जो आपल्यासाठी धडपडतो.. जो आपल्यासाठी लढतो.. दरवेळी आपल्या हाकेला धाऊन येतो.. त्या माणसाला या निवडणुकीत आधार देण्याची ही खरी वेळ आहे..

आपल्यासाठी तो माणूस झिजलाय.. स्वतःच्या घरावर तुळशीपत्र ठेऊन आपल्या संकटात आपल्यासाठी वेळोवेळी धावलाय.. त्या माणसाला आज तुमच्या - माझ्या साथीची गरज आहे, आधाराची गरज आहे.. त्यांच्या पाठीशी उभं राहून त्यांना पाठबळ देणं हे आता आपलं आद्यकर्तव्य आहे...

आजच एक वज्रनिर्धार करूयात... आपण आपल्या आयुष्यातील हे ३० दिवस दादांसाठी देऊयात..

एकसंघ, एकविचार आणि एकदिलानं लढूयात मतभेद- मनभेद असतील अथवा नसतील त्या साऱ्यांच्या या ३० दिवसात गाशा गुंडाळून ठेऊया आणि हा उस्मानाबादचा बुरुज दादांसाठी भक्कम बाहुत देत अधिक बळकट करूया, अभेद्य ठेवूया..

ही  दादांसाठी वेळ आहे आता कमी पडलात तर कधीच ही वेळ भरून निघणार नाही.. आणि आपल्याला येणाऱ्या पिढ्या, वेळ, काळ कधीही माफ करणार नाही..

साथ द्या..
आपल्या माणसाला..

आपल्या हक्काच्या माणसाला..Post a Comment

Previous Post Next Post