उस्मानाबाद - माजी मंत्री राणाजगजितसिंह पाटील यांना भाजपने तुळजापूर मतदार संघाततून उमेदवारी दिली असून या मतदारसंघात पाटील विरूद्ध चव्हाण असा सामना रंगणार आहे. राणाजगजितसिंह पाटील यांनी उस्मानाबाद-कळंब मतदारसंघातून उमेदवारीची मागणी केली होती मात्र उस्मानाबाद च्या जागा शिवसेनेकडे कायम ठेवण्यात आली आहे. उस्मानाबाद तालुक्यातील ७२ गावे तुळजापूर मतदारसंघात आहेत. खुद्द राणाजगजितसिंह पाटील यांचे तेर हे गावही याच मतदारसंघात असल्याने 'आयात उमेदवार' दिला अश्या चर्चांना आता विराम मिळाला आहे. दोन माजी मंत्र्यामधे आता काट्याची टक्कर होणार आहे. तर वंचित आघाडी कोणाला उमेदवारी देणार याकडे लोकांच्या नजरा आहेत.
Tags
उस्मानाबाद
Only Mahendra kaka dhurgude
ReplyDelete