तुळजापुरातून आ.चव्हाण की, आ.राणाजगजितसिंह पाटील ?

उस्मानाबाद - उस्मानाबाद जिल्ह्यात विधानसभा निवडणुकांचा प्रचार अंतिम टप्प्यात आला आहे. सर्वात हाय व्होल्टेज लढत तुळजापूर मतदार संघात होत आहे. या मतदार सांगत दोन तालुक्यांचा समावेश होतो उस्मानाबाद मतदारसंघातील 72 गावे आणि संपूर्ण तुळजापूर तालुका. एकूण 18 उमेदवार नशीब आजमावत असले तरी मुख्य लढत भाजपचे राणाजगजितसिंह पाटील कॉंग्रेसचे मधुकरराव चव्हाण वंचित बहुजन आघाडीचे अशोक जगदाळे यांच्यात होत आहे. मधुकरराव चव्हाण सलग तीन टर्म आमदार आहेत. त्यापैकी काही काळ त्यांचा कॅबिनेट मंत्रीपदी व मराठवाडा वैधानिक विकास महामंडळाच्या अध्यक्षपदी गेला. या कार्यकाळात जिल्ह्यात किवा मतदारसंघात नेमका काय बदल झाला हे जनतेला अपेक्षित होते मात्र प्रचारादरम्यान या गोष्टी येत नाहीत. रोजगाराची समस्या किती प्रमाणात सुटली याचा ऊहापोह प्रचारात होत नाही. तुळजापूर देव्वस्थनाला पर्यटन क्षेत्र म्हणून विकसित करण्यासाठी नेमकी काय पावले उचलली आहेत याची मांडणी लोकांना दिसत नाही. उलट मला शेवटची संधी द्या’ असा प्रचार आमदार चव्हाणांकडून सुरू असल्याने लोकांमध्ये नेमकी शेवटची संधी कशासाठी असा सवाल जनतेतून विचारला जात आहे. धावत्या युगात आपला लोकप्रतिनिधी आपल्या कामांसाठी किती धावू शकतो याचाही जनता गांभीर्याने विचार करत आहे. 2014 च्या विधानसभा निवडणुकीत जनतेने शेवटची संधी म्हणून निवडून दिले त्यानंतर आजपर्यंत मतदारसंघातील नेमके किती प्रश्र्न सुटले याची आकडेवारी जनतेला मिळू शकेल काय? पाण्यासारखा गंभीर विषय सोडवण्यासाठी काय धोरणे आखणार आहोत याचा प्रचारात समावेश आहे काय? उस्मानाबाद तालुका पिकविम्यातून वगळला होता शेकडो शेतकरी हक्काच्या पैशापासून वंचित असताना विद्यमान आमदारांनी किती वेळा तो प्रश्र्न लाऊन धरला? किंवा रस्त्यावर उतरून आंदोलन करून उस्मानाबाद तालुक्यातील शेतकर्‍यांचा प्रश्र्न सोडवण्यासाठी प्रयत्न केल्याचे कोणालाही आठवत नाही. भातुकलीचा डाव असल्यागत मतदारांना शेवटची संधी द्या म्हणणे हे कितपत योग्य आहे. याचा खल अख्ख्या मतदार संघात सुरू आहे. सध्या तरुण वर्ग राजकारणात मोठ्या प्रमाणावर एंट्री करत असतानाच तब्बल तीन वेळा आमदारकीची संधी देऊनही थकलेल्या अवस्थेत पुन्हा अजून संधीची मागणी आमदार चव्हाण मतदारापुढे करत आहेत याला संधीसाधू म्हणावे की काय? असा उलट सवाल जनतेतून विचारला जात आहे. आ.चव्हाणांपेक्षा राणादादा हे तरुण असल्याने व त्यांच्या प्रशासकीय कामकाजाची पद्धत जिल्ह्याला परिचित असल्याने व राणा पाटलांचा प्रचारही धडाकेबाजपणे सुरू असल्याने तुळजापूरचा मतदार राजा यावेळी नेमकी कोणाला संधी देतो यासाठी निकालाची वाट पहावी लागणार आहे.

Post a Comment

Previous Post Next Post