युगारंभ यात्रेतून भाजप करणार शक्तिप्रदर्शन


तुळजापूर - विधानसभा निवडणुकीचा प्रचार आता अंतिम टप्प्यात आला आहे. शक्तिप्रदर्शन आणि प्रचार करण्यासाठी अवघे काही तास शिल्लक आहेत. तुळजापूर विधानसभा मतदार संघातील महायुतीचे उमेदवार राणाजगजितसिंह पाटील यांच्या प्रचारार्थ आज दि.१८/१०/२०१९ रोजी सायं ठीक ०५ वा. हंगरगा (तीर्थ) पासून 'युगारंभ यात्रा' (रोड शो व रॅली) चे आयोजन करण्यात आले आहे ही यात्रा हंगरगा- तिर्थ(खु)- तिर्थ (बु) - बिजनवाडी - चिंचोली - आरळी (खु )- आरळी (बु ) - येवती- आरबळी -  इटकळ- केशेगाव - देवसिंगा- नीलेगवा - गुळहळी -दहीटना- शहापुर - गुजनुर - खुदावाडी मार्गे जाणार  असून अणदूर येथे रात्री ०९ वा. जाहीर सभा होणार आहे. या सभेला
भाजपा नेते देवानंदभाऊ रोचकरी, युवा नेते मल्हारदादा पाटील व महायुतीचे प्रमुख नेते, पदाधिकारी उपस्थिती राहणार आहेत.
तरी या 'युगारंभ यात्रेत' मोठ्या संख्येने उत्स्फूर्तपणे सहभागी व्हावे असे आवाहन करण्यात येत आहे.

Post a Comment

Previous Post Next Post