उस्मानाबाद - वंचित बहुजन आघाडीची तुळजापूर मतदारसंघाची उमेदवारी अशोक जगदाळेंना जाहीर झाली आहे. यांनतर तुळजापूर मतदार संघात तंगडी फाईट होणार हे आता नक्की आहे. भाजपची उमेदवारी राणाजगजितसिंह पाटील याना जाहीर झाल्यानंतर अशोक जगदाळे वंचित आघाडीकडे गेले होते. अनेक मिन्नतवाऱ्या करून त्यांनी हि उमेदवारी मिळवल्याचे चर्चा आहे. वंचितकडून या पूर्वी गणेश सोनटक्के, महेंद्र धुरगुडे यांनी मुलाखती दिल्या होत्या दोघांपैकी एकास उमेदवारी मिळणार हे निश्चित असताना वेगळीच 'दाळ' शिजल्याने त्यांचा पत्ता कट झाला. धुरगुडे आणि सोनटक्के यांचे राजकारण चव्हाण विरोधी राहिले आहे ते आता नेमकी काय भूमिका घेतात हे आता पहावे लागणार आहे.