दैनिक जनमत : निवडून आल्यानंतर पाच वर्षात उजनीचे २१ टीएमसी पैकी ७ टीएमसी पाणी जिल्ह्यात आणले नाही तर राजकारण सोडून देईन-राणाजगजितसिंह पाटील

ताज्या बातम्या, धाराशिव,कोल्हापूर,सांगली,सातारा,पुणे,शेतीविषयक माहिती,योजना,रोजगार संधी

Monday, October 7, 2019

निवडून आल्यानंतर पाच वर्षात उजनीचे २१ टीएमसी पैकी ७ टीएमसी पाणी जिल्ह्यात आणले नाही तर राजकारण सोडून देईन-राणाजगजितसिंह पाटील


नळदुर्ग :- जिल्ह्याचा पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी सोडविण्याकरिता एकदा निवडून द्या निवडून आल्यानंतर पाच वर्षात कृष्णा खोरे च्या माध्यमातून उजनीचे 21 टीएमसी पैकी 7 टीएमसी पाणी आणले नाही तर राजकारण सोडून देईन असे मत तुळजापूर विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार राणाजगजीतसिंह पाटील यांनी 6 ऑक्टोबर रोजी प्रचाराच्या नियोजनासाठी आयोजित नळदुर्ग शहर, अणदुर, शहापूर, नंदगाव, जळकोट जिल्हा परिषद सर्कल च्या बूथ प्रमुख व शक्ती केंद्रप्रमुख यांच्या बैठकीत व्यक्त केले. पुढे बोलताना राणाजगजितसिंह पाटील म्हणाले की नळदुर्ग शहराला तालुक्याचा दर्जा द्या म्हणून नळदुर्ग व परिसरातील लोकांची अनेक वर्षांची मागणी आहे. सध्या तो प्रश्न गेल्या अनेक वर्षापासून प्रलंबित असून केंद्रात व राज्यात भाजपची सत्ता असल्याने तो प्रश्न सोडविण्यासाठी तुळजापूर विधानसभा मतदारसंघात महायुतीचा झेंडा फडकावुन निवडून द्यावे आमदार झाल्यानंतर पाच वर्षात  नळदुर्ग तालुक्याचा तसेच रोजगाराचा प्रश्न कायमस्वरूपी मिटावा याकरिता तुळजापूर तालुक्यात मोठे उद्योगधंदे सुरू करून तरुणांच्या रोजगारचा प्रश्न मार्गी लावणार असल्याचा मत उपस्थित कार्यकर्त्यांसमोर आपले मनोगत व्यक्त करताना व्यक्त केले  . यावेळी उपस्थित अॅड अनिल काळे, देवानंद  रोचकरी, अॅड व्यंकटराव गुंड, तालुकाध्यक्ष सत्यवान सुरवसे, जिल्हा परिषद अध्यक्ष नेताजी पाटील, विजय शिंगाडे, प्रभाकर मुळे, आदेश कोळी यांनी मार्गदर्शन केले  यावेळी नळदुर्ग शहराध्यक्ष पद्माकर घोडके, सुशांत भूमकर, युवा मोर्चा शहराध्यक्ष श्रमिक पोतदार, व्यापारी आघाडी चे तालुकाध्यक्ष धिमाजी घुगे, अर्जुन कदम, माजी उपनगराध्यक्ष दिलीप कुलकर्णी, माजी नगराध्यक्ष दत्तात्रय दासकर दासकर, नगरसेवक उदय जगदाळे, माजी उपनगराध्यक्ष शफी शेख, सुनील बनसोडे गोपाळ देशपांडे, शिवसेनेचे राजेंद्र जाधव, युवा सेनेचे माजी तालुकाध्यक्ष ज्ञानेश्वर घोडके, सचिन घोडके, सागर हजारे, रासपचे सोमनाथ गुड्डे, रिपाइचे दुर्वास बनसोडे, बाबा बनसोडे, आनंद लाटे, कैलास चव्हाण, दीपक घोडके, गौस शेख, सादिक बागवान, भीमाशंकर बताले, रमेश घोडके आदी कार्यकर्ते व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार माजी पंचायत समिती सदस्य साहेबराव घुगे यांनी व्यक्त केली