भाजपचे पदाधिकारी ठाण मांडून; देवानंद रोचकरींनी कसली कंबरतुळजापूर - तुळजापूर मतदार संघात निवडणूक प्रचाराला वेग आला असून भाजपचे पदाधिकारी प्रचारासाठी  ठाण मांडून बसले आहेत. भाजपचे नेते देवानंद रोचकरी यांनीही भाजपच्या प्रचारासाठी कंबर कसली आहे. दिवसभर कार्यकर्त्यांच्या गाठीभेटी तर रात्री सभा असा दिनक्रम सुरू आहे. भाजपने रोचकरी यांना महामंडळाचे आश्वासन दिले असून रोचकरी यांच्या ताकदीचा फायदा महायुतीचे  उमेदवार राणाजगजितसिंह पाटील यांना  होणार आहे. यापूर्वीच्या निवडणुकात देवानंद रोचकरी यांनी २०१४- ३५८९५, २००९- ४५९४२,२००४- ३७५१३ एवढी मते घेतली होती त्यांना मानणारा वर्ग पाहता तेच मतदान भाजपला होईल असा अंदाज लावला जात आहे. तर एकीकडे मधुकरराव चव्हाण सोशल मीडिया पासून अलिप्त असल्याने ते किती मतदारपर्यंत पोचतील याबाबत साशंकता आहे. वांचीतचे जगदाळे आणि प्रहारचे धुरगुडे यांनी वयक्तिक भेटीगाठी वर भर दिला आहे.

No comments:

Post a Comment