शासनासोबत २७ कोटीची फसवणूक; वैष्णोदेवी फूडच्या अध्यक्षांसह इतरांवर गुन्हा दाखल


 नळदुर्ग (लतीफ मामा शेख):- नियंत्रण अधिकारी व शासनाच्या प्रतिनिधी यांच्या परस्पर शासनाच्या मालकीची मलाई विरहित दूध भुकटी व देशी कुकिंग बटरची विक्री करून 27 कोटी 19 लाख 70 हजार 561 रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी तुळजापूर तालुक्यातील बाभळगाव पोस्ट ईटकळ येथील वैष्णोदेवी फूड प्रॉडक्ट लिमिटेड च्या अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालकासह दोन वरिष्ठ महा व्यवस्थापकांसह करणाऱ्या इतर लोकांविरोधात  4 ऑक्टोबर रोजी नळदर्ग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलीस ठाणे कडून मिळालेली माहिती अशी की तुळजापूर तालुक्यातील बाभळगाव येथील वैष्णोदेवी फूड प्रॉडक्ट लिमिटेड कंपनीचे समीर गोविंदा काकांनी अध्यक्ष व्यवस्थापकीय संचालक रा. सोलापूर, विजय विश्वनाथ मुळे वरिष्ठ महा व्यवस्थापक रा. सोलापूर, सदर फसवेगिरी मध्ये सदर प्रकल्पाचे आर्थिक व्यवहार व रेकॉर्ड सांभाळणारे श्रीकांत जोशी वरिष्ठ महाव्यवस्थापक (प्रशासन) रा पुणे व या तिघांना सहाय्य करणाऱ्या इतर लोकांनी शासनाच्या मालकीची मलाई  विरहित दूध भुकटी 610.791 मे टन व देशी कुकिंग वॉटर 452.616 मे टन असा एकूण 27  कोटी 19 लाख 70 हजार 561 रुपयांचा माल 5 -9 -2018  रोजी रात्री 8  ते 21- 8- 2019 रोजी 3 वाजण्याच्या दरम्यान आरोपींनी संगणमत करून नियंत्रण अधिकारी व शासनाचे प्रतिनिधी यांच्या परस्पर विक्री करून फसवणूक केल्याप्रकरणी प्रशांत प्रभाकर मोहोड रा. औरंगाबाद यांनी  4 ऑक्टोबर रोजी नळदुर्ग पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून वरील तिघांसह इतर आरोपी विरोधात  गुन्हा रजिस्टर नंबर 288/ 2019 कलम 420, 406, 407 ,34 भादवी प्रमाणे  दाखल करण्यात आला. पोलीस अधीक्षक उस्मानाबाद यांच्या आदेशानुसार तपास अंजुम शेख पोलीस उपअधीक्षक  आर्थिक गुन्हे शाखा उस्मानाबाद हे करीत आहेत.

Post a Comment

Previous Post Next Post